भारतीय क्रिकेटमधून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 74 होते. त्यांनी बुधवारी (दि. 22 फेब्रुवारी) सायंकाळी जवळपास 6.30 वाजता जगाचा निरोप घेतला. उमेश यादव याचे वडील मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच घरी आणले गेले होते. अशात आता त्यांच्या निधनामुळे उमेश यादव आणि त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव (Umesh Yadav Father Tilak Yadav) हे वलनी कोळश्याच्या खाणीचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांना कुस्तीची आवड होती. तिलक यादव हे उत्तर प्रदेशच्या पडरोन जिल्ह्याच्या पोखरभिंडा गावातून नोकरीच्या शोधात नागपूर येथे आले होते.
वेस्टर्न कोलफील्ड्समध्ये काम करणारे तिलक यादव उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील रहिवासी होते. तिलक यांना तीन अपत्ये आहेत. त्यात दोन मुली आणि एक मुलगा उमेश यादव (Umesh Yadav) आहे. कोळश्याच्या खाणीत नोकरी लागल्यानंतर ते नागपूरजवळील खापरखेडी येथे राहू लागले होते. तिलक यादव यांची अशी इच्छा होती की, उमेशने पोलिसांची नोकरी करावी. वडिलांच्या इच्छेनुसार त्याने सैन्य आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला. मात्र, तो त्यात अपयशी ठरला.
मात्र, टेनिस चेंडूने क्रिकेट खेळणाऱ्या उमेशला रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने भारतीय संघासाठी 28 मे, 2010 रोजी वनडे पदार्पण केले. तो विदर्भ संघाकडून कसोटी खेळणारा पहिला खेळाडू बनला.
उमेश यादवची कारकीर्द
उमेश यादव याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 54 कसोटी सामने, 75 वनडे सामने आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 3.51च्या इकॉनॉमी रेटने 165 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, वनडेत 6.1च्या इकॉनॉमी रेटने 106 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याच्या नावावर 9 विकेट्स आहेत. (shocking cricketer umesh yadav father passes away in nagpur at 74)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो बाहेर होणार होता, पण विराटने त्याला पाठिंबा दिला’, दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केला मोठा खुलासा?
भारताच्या माजी दिग्गजाची घसरली जीभ! बुमराहविषयी म्हणाला, ‘आयपीएल खेळला नाहीतर जग नष्ट होणार नाहीये’