---Advertisement---

सलमान बटला मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर एका दिवसातच धक्कादायक निर्णय, वहाब रियाझने केली मोठी घोषणा

Wahab Riyaz
---Advertisement---

पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज सलमान बट्ट याला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. सलमान बट्टची पीसीबीच्या निवड समितीमध्ये एक दिवस आधी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यानंतर फिक्सिंगमध्ये गुंतलेल्या एका माजी खेळाडूला निवड समितीचा भाग करण्यात आल्याने बोर्डाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे अवघ्या एक दिवसानंतर त्याला पदावरून हटवण्यात आले. पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यानी याची घोषणा केली आणि सांगितले की आता सलमान बट कोणत्याही पॅनेलचा भाग नाही.

सलमान बट्ट, (Salman Butt) कामरान अकमल (Kamran Akmal) आणि राव इफ्तिकार अंजुम (Rao Iftikhar Anjum) यांची पीसीबीचा मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ (Wahab Riaz) याचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या तिघांनी 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारला होता, परंतु पीसीबीला सलमान बटबद्दल खूप टीकेला सामोरे जावे लागले, कारण त्यांनी एका कलंकित क्रिकेटपटूला बोर्डात स्थान दिले आहे. माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Rameez Raja) यांनीही सलमान बटच्या नियुक्तीवर टीका केली होती. सलमान बट 2010 मध्ये मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. यासाठी आयसीसीने सलमान बटवर 10 वर्षांची बंदीही घातली होती आणि त्याला लंडनमध्ये तुरुंगवासही भोगावा लागला होता.

त्यानंतर लगेचच वहाब रियाझने सलमान बटला सल्लागार पदावरून हटवले. प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “सलमान बट कोणत्याही पीसीबी पॅनेलचा भाग नाही. माझ्या माहितीनुसार, त्याला क्रिकेटची खूप चांगली समज आहे आणि तो गेली २-३ वर्षे देशांतर्गत क्रिकेट कव्हर करत होता. मला त्याचा सल्ला घेता यावा म्हणून त्याला माझा सल्लागार बनवण्यात आले होते. याचा आधार घेत काही मीडिया हाऊस आणि लोकांनी अपप्रचार सुरू केला. मुख्य निवडकर्ता या नात्याने माझ्यासोबत कोणाला काम करायचे आणि कोणाच्या पाठिंब्याची गरज आहे हे मी ठरवेन. पण लोक माझ्यावर घराणेशाही आणि मैत्रीचे आरोप करू लागले आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे. मी सलमान बटला सांगितले आहे की तो माझ्या टीममध्ये असू शकत नाही.” (Shocking decision within a day of Salman Butt getting a big responsibility Wahab Riaz made a big announcement)

महत्वाच्या बातम्या

‘तो त्या लायकीचाच नाही…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा वॉर्नरवर हल्लाबोल, वाचा का साधला निशाणा
IPL2024: पंड्यापेक्षा शुबमन गिल चांगला कर्णधार?, गुजरात टायटन्सच्या खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---