क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाची दिग्गज महिला क्रिकेटपटूचे माजी प्रशिक्षक आणि वर्तमानातील डेहराडून क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या हरेंद्र शाह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी त्यांना महिला खेळाडूंवर लैंगिक अत्या’चार, धमकावणे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हरेंद्र शाह यांच्यावर त्यांच्याच अकादमीतील महिला खेळाडूंनी शरीरसुखाची मागणी करण्याचा आरोप लावला आहे.
हरेंद्र शाह (Harendra Shah) अधिकतर 13 ते 18 वर्षीय मुलींना क्रिकेटचे प्रशिक्षक देत होते. अशात त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशिक्षक हरेंद्र शाह यांनी विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर त्यांच्यावर छेडछाड आणि लैंगिक अत्या’चाराचा आरोप लावण्यात आला. (shocking dehradun cricket coach harendra shah booked in sex scandal audio clip was leaked)
हरेंद्र शाह यांच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका खेळाडूसोबत त्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये त्यांना कथितरीत्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्यास सांगत अपशब्दांचा वापर करताना ऐकू येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, त्यांचा जबाब नोंदवता आला नाही. कारण, डॉक्टरांच्या मते, ते अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीयेत. डेहराडूनचे एसएसपी दलीप सिंग कुंवर यांनी म्हटले की, “आम्ही सर्व आरोपांचा तपास करत आहोत. यामध्ये सामील लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.”
सोमवारी (दि. 27 मार्च) रात्री शाह यांच्या अकादमीत एक 15 वर्षीय क्रिकेटपटूच्या वडिलांनी नेहरू कॉलनी ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीसोबत अनेकदा छेडछाड करण्यात आली. तक्रारीनंतर शाह यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलमानुसार 354- ए (लैंगिक अत्या’चार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) आणि पॉक्सो कायद्याच्या 7 आणि 8 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितला वगळून सूर्या बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार? आयपीएल 2023 आधी महत्त्वाचा निर्णय
“हार्दिक कसोटी क्रिकेटमध्ये नाव कमावेल”, माजी कर्णधाराने व्यक्त केला आत्मविश्वास