मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांचे रविवारी (दि. 5 फेब्रुवारी) निधन झाले आहे. ते दीर्घ काळापासून आजारी होते आणि दुबई येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर अमायलॉयडोसिस या आजारावर उपचार सुरू होते. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. राजकारणाच्या दुनियेत प्रसिद्ध असलेले परवेज हे क्रिकेटचेही मोठे चाहते होते. त्यांनी 2001 ते 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपती पद भूषवले होते. विशेष म्हणजे, याचदरम्यान भारतीय संघाने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.
परवेज मुशर्रफ (Parvej Musharraf) यांचा जन्म 11 ऑगस्ट, 1943 रोजी दिल्लीच्या दरियागंज भागात झाला होता. 1947मध्ये भारत-पाकिस्तानची फाळणी होण्यापूर्वी काही दिवसांआधीच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे वडील पाकिस्तान सरकारमध्ये काम करत होते.
Ex president General Parvez Musharraf passed away in Dubai pic.twitter.com/SDsI2EqPFc
— General Elon (Elon's Fan) (@general_elon12) February 5, 2023
सन 1998मध्ये परवेज बनले होते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख
परवेज मुशर्रफ हे सन 1998मध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बनले होते. त्यांनी भारताविरुद्धच्या कारगिल युद्धात त्यांचा मोठा हात होता. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा डाव हाणून पाडला होता. त्यांनी त्यांच्या ‘इन द लाईन ऑफ फायर- अ मेमॉयर’ या पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी कारगिलवर ताबा मिळवण्याची शपथ घेतली होती. मात्र, नवाज शरीफ यांच्यामुळे त्यांना तसे करण्यात अपयश आले होते.
परवेज यांच्यावर लागलेला राजद्रोहाचा आरोप
सन 2001 ते 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिलेल्या परवेज यांच्यावर राजद्रोहाचा आरोपदेखील लावण्यात आला होता. तसेच, 2019मध्ये घटना निलंबित करण्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली होती. 2020मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने परवेज यांच्याविरुद्ध नवाज शरीफ सरकारद्वारे करण्यात आलेल्या सर्व कारवाया असंवैधानिक घोषित केल्या होत्या. त्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली तक्रार दाखल करणे आणि विशेष न्यायालयाची स्थापना करत त्याच्या कार्यवाहीचा समावेश होता.
नवाज शरीफ यांनी बनवले होते लष्कर प्रमुख, त्यांनीच सत्तेवरून केलेली हाकालपट्टी
सन 1998मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ यांनी परवेज मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख बनवले होते. मात्र, एक वर्षानंतर 1999मध्ये परवेज यांनी नवाज शरीफांची सत्तेवरून हाकालपट्टी करत सत्ता हातात घेतली होती. त्यांनी सत्ता सांभाळताच नवाज शरीफांना कुटुंबासह पाकिस्तान सोडावे लागले होते. (shocking former pakistan president pervez musharraf death breathed his last in dubai hospital)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणारच नाही! आशिया चषक 2023 विषयी जय शहांची ठाम भूमिका
भारताचं मोठं टेंशन दूर, मिचेल स्टार्कनंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ घातक गोलंदाज कसोटी संघातून बाहेर