टेनिसविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा माजी दिग्गज टेनिसपटू डेविड नालबँडियन याच्याविषयी ही बातमी आहे. एक्स गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये डेविड नालबँडियन हिडन कॅमेरा लावून व्हिडिओ बनवत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. 41 वर्षीय डेविडने विंबल्डनमध्ये 11 एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच, 21 वर्षांपूर्वी तो विंबल्डन फायनलिस्टही राहिला आहे. मात्र, आता तो संकटात सापडताना दिसत आहे.
रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, डेविड नालबँडियन (David Nalbandian) याने त्याची एक्स गर्लफ्रेंड अरसेली टोराडो (Araceli Torrado) हिच्यापासून वेगळे झाल्यानंतर तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये हिडन कॅमेरा लावला होता.
एक्स गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये हिडन कॅमेरा
माध्यमांतील वृत्तांनुसार, सप्टेंबर 2022 ते जून 2023 यादरम्यान डेविड आणि टोराडो हे नात्यात होते. मात्र, नंतर दोघे वेगळे झाले, पण नालबँडियनने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडवर पाळत ठेवण्यासाठी बेडरूममध्ये हिडन कॅमेरा (Hidden Camera in Ex Girlfriend’s Bedroom) लावला होता. हे दोघेही इटलीच्या पलेर्मोमधील एका अपार्टमेंटमध्ये राहायचे.
रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, जेव्हा टोराडोच्या भावाने फ्लॅटला भेट दिली, तेव्हा त्याने कथितरीत्या कव्हर हटवणे आणि कॅमेरा शोधण्यापूर्वी एक एयर शाफ्टच्या मागे एक चमकणारी वस्तू दिसली. कॅमेरा टोराडोच्या बेडरूममध्ये लावण्यात आला होता. तेव्हापासून ती खूपच चिंतीत आहे.
अर्जेंटिनाचे वृत्तपत्र ला नेसियोनच्या रिपोर्टनुसार, एक व्हॉइस मेसेजमध्ये माजी टेनिसपटू कथितरीत्या म्हणत आहे की, “मी प्रामाणिक राहावं, असं तुला वाटतंय का? होय, मी कॅमेरा सेट केला, पण मी काहीच पाहू शकलो नाही, कारण इंटरनेटच्या समस्या होत्या.”
असे म्हटले जात आहे की, 41 वर्षीय डेविडवर त्याची एक्स गर्लफ्रेंडकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (shocking former wimbledon finalist david nalbandian accused of installing hidden camera in ex girlfriend bedroom read)
हेही वाचा-
भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींच्या ड्रेसिंग रूम भेटीवर शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
“त्याला शिकवण्याची गरज नाही”, रोहितला लक्ष्य करणाऱ्यांवर अश्विन संतापला