क्रीडाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. एका दिग्गज फुटबॉलपटूचे निधन झाले आहे. जाणारा जातो, पण जाणारा व्यक्ती कोण आहे हे सर्वात महत्त्वाचं असतं. गोव्याचे दिग्गज फुटबॉलपटू मेनिनो फिगिरेदो यांनी शनिवारी (दि. 8 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने फुटबॉलविश्वार शोककळा पसरली आहे. फिगिरेदो यांना गोव्याचे पहिले आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे फुटबॉलविश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक चाहत्यांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मेनिनो फिगिरेदो (Menino Figueiredo) यांनी राज्याच्या फुटबॉल संघाचे नेतृत्वही केले होते. संतोष ट्रॉफी स्पर्धेमध्ये 1964 साली त्यांनी राज्याच्या संघाचे नेतृत्व केले होते. विशेष म्हणजे, फिगिरेदो यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी MCC या संघासोबत खेळायला सुरुवात केली होती. या संघाकडून ते क्लब पातळीवर खेळायचे.
Saddened by the passing away of Goa's first International Player & Captain of Team Goa in first Santosh Trophy Bab Menino Figueiredo. My condolences to his Family & Fans. May his Soul rest in peace. pic.twitter.com/VDNHbNrkHz
— Yuri Alemao (@Yurialemao9) April 8, 2023
Deeply saddened by the demise of Menino Figueiredo, #Goa's first #International #Football player. He was #Captain of the team that took part in the Santosh Trophy in 1964.
May eternal rest be granted unto him, and let perpetual light shine upon him. May he rest in peace. (1/2) pic.twitter.com/WI7630Jpdj
— Joshua Peter De Souza (Modi Ka Parivar) (@Joshua_De_Souza) April 8, 2023
President along with the Executive Committee of Goa Football Association condoles the death of Goan legend Menino Figueiredo, captain of the State team that took part in the Santosh Trophy for the first time in 1964 and he also has a distinction of being pic.twitter.com/xxqYvYkhBm
— Prakash W. Kamat (@PrakashWKamatPK) April 8, 2023
फिगिरेदो हे सन 1961 साली पोर्तुगालचा दौरा करणार होते. मात्र, पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याला मुक्तता मिळाली आणि त्यांना हा दौरा करता आला नाही. यानंतर फिगिरेदो साळगावकर एफसीमध्ये व्यावसायिक फुटबॉलपटूच्या रूपात तब्बल 13 वर्षे खेळले होते. यादरम्यान त्यांनी संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळख मिळवली होती. संघात त्यांच्यावर डिफेंडर म्हणजेच बचावपटूची जबाबदारी होती.
पुढे 1962 साली फिगिरेदो आणि साळगावकर संघाचा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरी सत्कार झाला होता. गोव्याच्या संघाने दिल्लीतील डीसीएम या फुटबॉल स्पर्धेतही भाग घेतलेला. त्यानंतर 1963 साली त्यांना रशियाच्या संघाविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळाली होती. फिगिरेदो यांनी 1963-64 या हंगामात साळगावकर क्लबचे कर्णधारपद सांभाळले होते. विशेष म्हणजे, रशियाचा संघ जेव्हा पुन्हा भारतात आला, तेव्हा फिगिरेदो यांनाही राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. (shocking goa legend footballer menino figueiredo passed away)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना मेस्सी, ना नेमार, रोनाल्डो बनला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘असा’ विक्रम करणारा अव्वल फुटबॉलपटू, वाचाच
एटीके मोहन बागानने उंचावली ISL ट्रॉफी! बेंगलोर एफसी पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत