क्रिकेटविश्वातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं नियंत्रण करणाऱ्या आयसीसी बोर्डाने मॅच फिक्सिंग रॅकेट याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. सन 2021च्या अमिराती टी10 लीगदरम्यान अनेक खेळाडू, अधिकारी आणि काही भारतीय संघ मालकांवर गंभीर भ्रष्ट कारवायांमध्ये सामील होण्यासाठी गंभीर आरोप लावले गेले आहेत. हा आरोप 2021च्या अबू धाबी टी10 लीगशी संबंधित आहेत. ही स्पर्धा 19 नोव्हेंबर 2021 ते 4 डिसेंबर 2021 यादरम्यान पार पडली होती.
या स्पर्धेत एकूण 6 संघांचा सहभाग होता. ज्या लोकांवर आरोप लावण्यात आला आहे, त्यामध्ये 2 भारतीय सहमालक पराग संघवी आणि कृष्णकुमार चौधरी यांचा समावेश आहे. हे दोघेही पुणे डेविल्स संघाचे सहमालक आहेत. दोघांव्यतिरिक्त यांचाच एक खेळाडू बांगलादेशचा माजी कसोटी फलंदाज नासिर हुसेन याच्यावरही भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोप आहे.
तिसरा आरोपी फलंदाजी प्रशिक्षक
भ्रष्ट कारवायांमध्ये सामील असलेला तिसरा व्यक्तीही भारतीय आहे. तो इतर कुणी नसून फलंदाजी प्रशिक्षक सनी ढिल्लन आहे. आयसीसीनुसार, हा आरोप 2021च्या अबू धाबी टी10 लीग आणि स्पर्धतील सामने फिक्स करण्याशी संबंधित आहे. मात्र, हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले होते. आयसीसीला या स्पर्धेसाठी अमिराती क्रिकेट बोर्डाकडून (ECB) लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी (DACO) म्हणून नियुक्त केले होते.
Eight players and officials face charges for violating ECB's Anti-Corruption Code.
Details 👇https://t.co/prPen8F0CK
— ICC (@ICC) September 19, 2023
अशाप्रकारे ईसीबीकडूनच हा आरोप जारी केला जात आहे. पराग संघवी यांच्यावर सामन्याचे निकाल आणि इतर गोष्टींवर सट्टा लावण्याचा तसेच, संस्थांना सहकार्य न करण्याचा आरोप आहे. याव्यतिरिक्त कृष्णकुमार चौधरी यांच्यावर लाचलुचपत गोष्टी लपवण्याचा आरोप आहे. तसेच, ढिल्लनवर मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे.
नासिरवर भेटवस्तूंच्या माहितीचा खुलासा न करण्याचा आरोप
बांगलादेशकडून 19 कसोटी आणि 65 वनडे सामने खेळणाऱ्या नासिर हुसेन याच्यावर लाचलुचपत प्रतिबंध अधिकाऱ्याला 750 डॉलर्सहून अधिक रक्कमेच्या भेटवस्तूंची माहिती न देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. ज्या इतर व्यक्तींचे निलंबन करण्यात आले आहे, त्यात फलंदाजी प्रशिक्षक अजहर जैदी, संघाचा मॅनेजर शादाब अहमद आणि यूएईचा देशांतर्गत खेळाडू रिझवान जावेद, सालिया समन यांचाही समावेश आहे.
आरोपांचे उत्तर देण्यासाठी 19 दिवसांचा वेळ
तीन भारतीयांसह एकूण 6 लोकांना अस्थायीरीत्या निलंबित केले आहे. तसेच, या सर्वांना आरोपांचे उत्तर देण्यासाठी 19 सप्टेंबर पासून 19 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. (shocking icc match fixing racket exposed indian cricketers former test cricketer alleged)
हेही वाचाच-
स्टार खेळाडू टीम इंडियात पुनरागमनासाठी तयार! मागच्या वर्षी खेळला होता शेवटचा सामना
विश्वचषकासाठी खास पाहुण्यांच्या यादीत सामील झाले रजनीकांत, जय शाह यांनी स्वतः दिले गोल्डन तिकिट