Hardik Pandya 100 Crore: इंडियन प्रीमिअर लीग अर्थातच आयपीएल 2024 हंगामाच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या निर्णयाने सर्वांना धक्का दिला. मुंबईने हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्स संघाकडून ट्रेड करत सर्वांच्या भुवया उंचावल्या. पाच वेळच्या मुंबईने गुजरातच्या 2022च्या चॅम्पियन कर्णधाराला मिळवण्यासाठी 15 कोटी रुपयांचा करार ऑफर केला. मात्र, याव्यतिरिक्त मुंबई संघाने अतिरिक्त ट्रान्सफर फी देखील दिली, ज्याविषयी फक्त आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिल समितीला माहिती होते. अशात आता या रक्कमेचा खुलासा झाला आहे.
रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने जेव्हा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून आपल्या ताफ्यात सामील केले, तेव्हा हार्दिक पंड्या याचा 15 कोटी (Hardik Pandya 15 Crore) रुपये पगार मुंबईच्या पर्समधून कापण्यात आला होता. तसेच, गुजरातच्या पर्समध्ये ही रक्कम जोडण्यात आली होती. यासोबतच गुजरातला पंड्याच्या पगारापेक्षाही जास्त रक्कम ट्रान्सफर फी (Transfer Fee) म्हणून मिळाली. माध्यमांतील वृत्तांनुसार, हार्दिक पंड्यासाठी मुंबई इंडियन्सने 100 कोटी (Mumbai Indians Paid 100 Crore For Hardik Pandya) मोजले. तसेच, त्याला आपल्या संघाचा भाग बनवले.
निश्चितच गुजरात टायटन्सने आपल्या कर्णधाराला सोडण्यासाठी एवढी रक्कम मागितली असेल. 2022मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये सामील झालेल्या गुजरातला पंड्याने पहिल्याच हंगामात किताब जिंकून दिला होता. त्यानंतर 2023च्या आयपीएल हंगामातही गुजरात अंतिम सामन्यापर्यंत मजल मारू शकला. अशात त्यांच्यासाठी पंड्याला मुंबईत पुन्हा पाठवणे खूपच कठीण निर्णय होता.
Hardik Pandya's trade details (Indian Express): pic.twitter.com/MNiN5grdYC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 24, 2023
मात्र, मुंबईकडून 100 कोटी रुपयांची ट्रान्सफर फी मिळाल्यामुळे पुढील वर्षी खाते बंद झाल्यावर संघाचे मूल्य 100 कोटींनी वाढेल. सीव्हीसी कॅपिटल एक गुंतवणूक फर्म आहे. त्यामुळे ही आश्चर्याची बाब नसेल की, फायद्यासाठी ते भविष्यातही गुजरात टायटन्स फ्रँचायझी इतर कुणालाही विकतील.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघाला अशा खेळाडूची गरज होती, जो रोहित शर्मानंतरही संघाचे नेतृत्व करू शकेल. त्यामुळे आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामासाठी मुंबईने रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा पत्ता कट करून हार्दिक पंड्याला आपला कर्णधार बनवले. मात्र, तो स्पर्धेचा भाग होण्याविषयी वेगवेगळ्या चर्चा आहेत, पण दूरचा विचार पाहता ही एक चांगली डील असल्याचे बोलले जात आहे. (shocking news ipl 2024 mumbai indians have paid gujarat titans an excess of rs 100 crores as a trading fee to acquire hardik pandya)
हेही वाचा-
विराटकडे फक्त 4 दिवस, सहज होऊ शकतो इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम नावावर
‘DRSचा वापर करण्यात राहुलपेक्षा भारी कुणीच नाही’, पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा