साताऱ्यातील शाहू क्रीडा संकूलामध्ये ६४ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत एकूण तीन दिवस झालेल्या लढतीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. ( Shocking Results In Maharashtra Kesari Competition 2022 )
क्रमांक १
सिकंदर शेख, वाशीम विरुद्ध विलास डोईफोडे, जालना या कुस्तीत सिकंदर शेख याने दहा शून्यने विजय म्हणजे एकतर्फी विजय मिळवला.
क्रमांक २
कौतुक ढाफळे विरुद्ध अनिल जाधव या कुस्तीत अनिल जाधव चितपट कुस्ती करत प्रेक्षकांची मने जिंकली.
क्रमांक ३
विशाल बनकर, मुंबई विरुद्ध बाला रफी शेख (महाराष्ट्र केसरी) या कुस्तीत विशाल बनकर १३-३ फरकाने विजयी झाला.
क्रमांक ४
हर्षवर्धन कोकाटे, पुणे विरुद्ध गणेश जगताप या कुस्तीत हर्षवर्धन कोकाटे विजयी झाला. हर्षवर्धन कोकाटे याने दुहेरी पट तसेच भारणदाज मारून गुणांची कमाई करत विजय साकारला.
क्रमांक ५
भारत मदने, मुंबई विरुद्ध विक्रम पारखी या कुस्तीमध्ये भारत मदने याने दुहेरी पट काढून चितपट कुस्ती केली. त्याचा विजय होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा पाऊस पाडला.
क्रमांक ६
गादी विभाग हर्षवर्धन सदगीर, नाशिक विरुद्ध संग्राम पाटील, कोल्हापूर या कुस्तीत हर्षवर्धन सदगीर याने गुणाधिकक्याने विजय प्राप्त केला.
क्रमांक ७
हर्षद कोकाटे, पुणे विरुद्ध अक्षय मदने, ठाणे या कुस्तीत हर्षद कोकाटे ६-१ च्या फरकाने विजयी झाला.
क्रमांक ८
अक्षय शिंदे, बीड विरुद्ध मेघराज शिंदे या कुस्तीत अक्षय शिंदे हा तब्बल दहा-शून्यने अशा फरकाने विजयी झाला.
क्रमांक ९
पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर विरुद्ध सुदर्शन कोतकर या कुस्तीत कोतकर १०-४ फरकाने विजयी झाला.
( Shocking Results In Maharashtra Kesari Competition 2022 )
अधिक वाचा
Maharashtra Kesari | मोठी बातमी! साताऱ्यात अवकाळी पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तात्पुरत्या स्थगित
Maharashtra Kesari | पैलवान बाला रफिक शेख याचा धक्कादायक पराभव, विशाल बनकरची १३-३ ने एकतर्फी मात
Maharashtra Kesari | ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ चरित्र ग्रंथाच्या १५व्या आवृत्तीचे प्रकाशन






