---Advertisement---

‘तो’ पुन्हा अडचणीत! वर्ल्डकप विजेता भारतीय खेळाडूविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण

Team-India
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस श्रीसंत आणि वाद, यांचे जुने नाते राहिले आहे. त्याचा खेळाडूंसोबत मैदानात वाद झाला होता, तर त्याच्यावर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदीही लावली होती. मात्र, नंतर त्याच्यावरील बंदी हटवण्यात आली होती. आता 2007 आणि 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेल्या श्रीसंतविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. केरळ पोलिसांनी एस श्रीसंतविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.

काय होते संपूर्ण प्रकरण?
माध्यमांतील वृत्तांनुसार, एस श्रीसंत (S Sreesanth) याच्यासह 3 लोकांवर फसवणुकीच्या आरोप लावला आहे. हे प्रकरण एप्रिल 2019मधील सांगितले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या कोल्लूरमध्ये एक स्पोर्ट्स अकादमी बनवण्यासाठी राजीव कुमार, एस श्रीसंत आणि वेंकटेश किनी यांनी 25 एप्रिल, 2019मध्ये एका तरुणाकडून 18.70 लाख रुपये घेतले होते. त्या तरुणाचे नाव सरीश गोपालन असून तो चुंडा येथील रहिवासी आहे. त्याने या प्रकरणात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सरीशने सांगितले की, त्याने स्पोर्ट्स अकादमी बनवण्यासाठी हा पैसा लावला होता. आशा होती की, ते त्याचे पार्टनरही बनतील. या तक्रारीनंतर श्रीसंतसह तिघांविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत तिघांवर फसवणुकीचा आरोप लागला आहे. अशात पुढे पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हे संपूर्ण प्रकरण केरळच्या उत्तर जिल्ह्यातील आहे.

श्रीसंत आणि वाद
श्रीसंत 2013मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला होता. त्यानंतर 2023मध्ये त्याच्यावरील बंदी हटवण्यात आली. त्यानंतर त्याच्या कारकीर्दीदरम्यान तो हरभजन सिंग याच्यासोबतच्या ‘थप्पड वादा’तही अडकला होता. याव्यतिरिक्त श्रीसंत कारकीर्दीदरम्यान त्याच्या आक्रमक स्वभावामुळेही त्याचे आणि वादांचे नाते नेहमीच घट्ट राहिले. त्यानंतर टीव्ही रिऍलिटी शो बिग बॉसमध्येही तो दिसला. त्यातही तो वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसला. (shocking s sreesanth booked in fraud case fir lodged by kerala police)

हेही वाचा-
सूर्या… इतिहास घडवणारा कॅप्टन! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला आजपर्यंत कुणालाच न जमलेला विक्रम, घ्या जाणून
रिंकूने अखेरच्या चेंडूवर मारला गगनचुंबी सिक्स, पण खात्यात जोडल्या गेल्या 0 धावा; ICCचा हैराण करणारा नियम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---