क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघाचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किया विश्वचषकातून बाहेर पडला आहे. तसेच, सिसांडा मगला हादेखील फिटनेस सिद्ध न करू शकल्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ही माहिती स्वत: आयसीसीने दिली आहे.
एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) याने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला होता. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे फक्त 5 षटकेच टाकता आल्या होत्या. यानंतर तो गोलंदाजीसाठी परतला नाही. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर त्याने 13 चेंडूत 10 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित मालिकेत एन्रीच नॉर्किया खेळला नव्हता.
🚨 JUST IN: South Africa have been forced into changes with two fast bowlers failing to recover from injuries ahead of #CWC23!
Details 👇
— ICC (@ICC) September 21, 2023
विशेष म्हणजे, नॉर्कियाला या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या 15 सदस्यीय संघात निवडले गेले होते. नॉर्किया दुखापतग्रस्त झाल्यामुळे आता संघाला त्याच्या जागी दुसरा खेळाडू शोधणे खूपच कठीण ठरेल.
नॉर्कियाची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी प्रभावी राहिली आहे. त्याने 22 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, त्याने 27.27च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत. संघाला आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेत त्याची उणीव नक्कीच भासेल. खासकरून भारतीय परिस्थितीत आपल्या गतीचा प्रभावीपणे वापर करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो संघासाठी हुकमी एक्का ठरू शकला असता.
दक्षिण आफ्रिका संघात नॉर्किया आणि सिसांडाच्या जागी अँडिले फेहलुकवायो आणि लिझाद विलियम्सला घेण्यात आले आहे. फेहलुकवायोने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वनडे सामने खेळले आणि प्रत्येकी एक विकेट घेतली.
विश्वचषक 2023साठी दक्षिण आफ्रिका संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएट्जी, क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रीच क्लासेन, सिसांडा मगला, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर डुसेन (shocking South Africa have been forced into changes with two fast bowlers failing to recover from injuries ahead of CWC23)
हेही वाचाच-
‘चाय से ज्यादा किटली गरम… तो लैच Cool’, युवराजसोबत स्क्रीन शेअर करताच मराठमोळ्या अभिनेत्रीची भन्नाट पोस्ट
ना रोहित, ना विराट, ना बुमराह; World Cupपूर्वी आगरकरांनी ‘या’ खेळाडूला म्हटले ‘Trump Card’