पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची मोठी लेक अंशा आफ्रिदी हिचे मंगळवारी (दि.19 सप्टेंबर) लग्न झाले. अंशाचे लग्न पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्यासोबत पार पडले. यादरम्यान एक ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले गेले होते. यात बाबर आझम, मिस्बाह उल हक आणि सईद अन्वर यांसारखे खेळाडूही सामील झाले होते. तसेच, लग्नानंतर लेकीला निरोप देताना शाहिद आफ्रिदी भावूक झाला. त्याने सोशल मीडियाद्वारे लेकीसाठी प्रेमळ पोस्ट शेअर केली.
विशेष म्हणजे, शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी (Shaheen Afridi And Ansha Afridi) हे दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहेत. यापूर्वी त्यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाले होते. मात्र, त्यादरम्यान लॉकडाऊन असल्यामुळे लग्नात जास्त लोक सामील होऊ शकले नव्हते. त्यामुळे आफ्रिदीने पुन्हा एकदा लेकीचे लग्न लावले. यादरम्यान मंगळवारी सेलिब्रेशन झाल्यानंतर आफ्रिदीने ट्वीट (एक्स) करत एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तो जावई शाहीन आणि लेक अंशा सोबत दिसत आहे.
ही पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या घरात काल जो प्रकाश आला होता, तो आता आमच्या डोळ्यासमोरून निघून जात आहे. वडिलांचे मन जड झाले आहे, पण नव्या सकाळची उमेद त्यांना द्यायला आली आहे.”
آیا تھا گھر میں نور ابھی کل کی بات ہے
رخصت بھی ہو رہا ہے وہ آنکھوں کے سامنےڈوبا ہوا بھی ہے ترے بابا کا دل مگر
امید صبح نو اسے آئی ہےتھامنےAnshaheen@❤️ pic.twitter.com/TJRDgn3jIb
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) September 19, 2023
या लग्न समारंभातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांना आनंद आहे की, बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात सर्वकाही ठीक आहे. बाबरने आफ्रिदीची गळाभेट घेत आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
पाकिस्तानचा आशिया चषकात पराभव
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाला आता विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारताचा दौरा करायचा आहे. क्रिकबझ या आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटनुसार पाकिस्तान संघ 27 सप्टेंबर रोजी दुबईहून हैदराबादला पोहोचेल. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी अद्याप आपल्या संघाची घोषणा केली नाहीये. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, कोणकोणते खेळाडू ताफ्यात सामील होतील. (former pakistani captain shahid afridi pens emotional note on his daughters wedding with shaheen shah afridi)
हेही वाचाच-
दक्षिण आफ्रिकेला 880 व्होल्टचा झटका! World Cup 2023मधून ‘हे’ 2 घातक वेगवान गोलंदाज बाहेर, लगेच वाचा
‘चाय से ज्यादा किटली गरम… तो लैच Cool’, युवराजसोबत स्क्रीन शेअर करताच मराठमोळ्या अभिनेत्रीची भन्नाट पोस्ट