क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी वेस्ट इंडिज संघाचा यष्टीरक्षक फलंदाज शेन डाउरिच याच्याशी संबंधित आहे. शेन डाउरिच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) डाउरिचने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. 32 वर्षीय डाउरिच वेस्ट इंडिजकडून 35 कसोटी आणि फक्त 1 वनडे सामना खेळला आहे.
शेन डाउरिच (Shane Dowrich) याने अखेरचा कसोटी सामना डिसेंबर 2020मध्ये खेळला होता. तसेच, एकमेव आणि अखेरचा वनडे सामना सामना 2019मध्ये बांगलादेशविरुद्ध डब्लिन येथे खेळला होता. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अलीकडेच त्याची निवडही झाली होती, पण आता तो निवृत्त (Shane Dowrich Retire) झाला आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळताना ठोकले कसोटी शतक
वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज शेन डाउरिच याने निवृत्ती (Shane Dowrich Retirement) घेतल्यानंतर अनेक माजी खेळाडूंची विधानं समोर येत आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेटचे संचालक माइल्स बासकोंबो यांनी डाउरिचच्या योगदानासाठी धन्यवाद दिला आहे. ते म्हणाले की, “आम्ही वेस्ट इंडिजसाठी त्याच्या योगदानासाठी धन्यवाद देऊ इच्छितो. त्याने नेहमीच स्टम्पच्या पुढे आणि मागे आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. त्याच्यासाठी सन 2019मध्ये एक यादगार विजय होता, जेव्हा त्याने घरच्या मैदानावर एक शानदार कसोटी शतक ठोकले होते. तसेच, इंग्लंडला हरवून आम्हाला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.”
BREAKING NEWS – Shane Dowrich has announced his retirement from international cricket and will not be part of the upcoming CG United ODI Series in Antigua and Barbados pic.twitter.com/qOzmSBx0xE
— Anmar Goodridge-Boyce (@anmargboyce) November 30, 2023
डाउरिचने खेळले 35 कसोटी सामने
अलीकडेच, डाउरिचने सुपर 50 चषकातील 5 डावात 78च्या सरासरीने 1 शतक आणि 1 अर्धशतकाच्या मदतीने 234 धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याचे वनडे संघात पुनरागमन झाले होते. मात्र, त्याने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. डाउरिचने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अधिकतर कसोटी सामने खेळले आहेत. त्याने वेस्ट इंडिजकडून 35 कसोटी सामने खेळताना 29.07च्या सरासरीने 1570 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 9 अर्धशतकांचाचाही समावेश आहे. दुसरीकडे, वनडेत त्याने फक्त 6 धावा केल्या आहेत. (shocking west indies wicketkeeper batsman shane dowrich suddenly retired from international cricket)
हेही वाचा-
INDvsAUS 4th T20: टीम इंडिया मारणार का रायपूरचं मैदान? वाचा खेळपट्टी ते हवामानापर्यंत सर्व माहिती
रोहित आणि विराट बद्दल उलटसुलट चर्चा करु नका, स्वतः बीसीसीआयने दिलंय स्पष्टीकरण