क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ओडिसामध्ये 11 जानेवारीपासून बेपत्ता असलेली महिला क्रिकेटपटू राजश्री स्वांई हिचा मृतदेह जंगलात शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. या बातमीनंतर आता सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, राजश्रीने सुसाईट नोटही मागे सोडली आहे. कटक पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
कटक डीसीपी पिनाक मिश्र यांनी म्हटले आहे की, राजश्री स्वांई (Rajshree Swain) ही बेपत्ता होण्याबाबत मंगलाबाग ठाण्यात तक्रार दाखल केली गेली होती. याच आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला होता. अशात शुक्रवारी आठगडच्या जंगल परिसरात राजश्रीच्या गाडीबाबत समजले. त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी तपास केला आणि तिचा मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा केल्यानंतर राजश्रीचा मृतदेह (Rajshree Suicide) एससीबी मेडिकलमध्ये पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहोचत सुरू केला तपास
मात्र, यादरम्यान बज्रकबाटी येथे महावीर गॅलेक्सी हॉटेलमधून राजश्रीच्या बेपत्ता होण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनेची चौकशी केली. प्रशिक्षकासोबतच काही खेळाडूंचीही चौकशी केली गेली. तेथून माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. या घटनेत जे दोषी असतील किंवा ज्यांच्यावर आरोप असतील, त्यांना चौकशीच्या कक्षेत आणून बारकाईने तपास केला जाईल.
सुसाईड नोटमध्ये मानसिक छळ केल्याचा आरोप
दुसरीकडे, महिला क्रिकेटपटू राजश्री स्वांई (Woman Cricketer Rajshree Swain) हिचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हॉटेलात राहणाऱ्या प्रशिक्षकापासून ते इतर खेळाडूंनी मौन बाळगले आहे. राजश्रीकडून एक सुसाईड नोटही मिळाली आहे. असे म्हटले जात आहे की, नोटमध्ये तिने म्हटलंय, ती चांगली खेळत होती, तरीही तिला दुर्लक्षित केले जात होते. तसेच, वारंवार मानसिक छळ केला जात होता.
राजश्रीची ही सुसाईड नोट समोर आल्यानंतर आता प्रशिक्षक आणि ओडिसा क्रिकेट असोसिएशनचे व्यवस्थापनही चौकशीच्या घेऱ्यात आले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी हॉटेलची 211 नंबरची खोली सील केली आहे. (shocking woman cricketer rajshree left behind suicide note accused of mental harassment)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तो आला, त्याने मॅच जिंकून दिली; तरीही ड्रेसिंग रूममध्ये का खावा लागला ओरडा?, कुलदीपचा मोठा खुलासा
रोहितने दिली संधी, पण कुलदीपने भलत्याच खेळाडूचे गायले गुणगान; म्हणाला, ‘त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला’