गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल याची तब्येत बिघडली आहे. याबाबत स्वत: कर्णधार हार्दिक पंड्याने खुलासा केला आहे. हार्दिक पंड्या याने सांगितले आहे की, कदाचित यश आयपीएल 2023 हंगामातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. खरं तर, यशने त्याचा या हंगामातील शेवटचा सामना 9 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर रिंकू सिंग याने जोरदार फटकेबाजी करत 5 चेंडूत 5 षटकार मारले होते. त्यामुळे हा सामना गुजरातला 3 विकेट्सने गमवावा लागला होता.
कोलकाताविरुद्धच्या अखेरच्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने यश दयाल (Yash Dayal) याला 29 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, रिंकू सिंग याने षटकारांचा पाऊस पाडत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. यानंतर पुढील सामन्यात यश दयाल याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले गेले आणि मोहित शर्मा (Mohit Sharma) याला संधी देण्यात आली.
आता हार्दिक पंड्या याने यश दयालच्या तब्येतीविषयी मोठी माहिती दिली आहे. पंड्या म्हणाला आहे की, वेगवान गोलंदाज तब्येत बिघडल्यामुळे हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकणार नाही. हार्दिकने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मी याची पुष्टी करू शकत नाही. त्या सामन्यानंतर तो आजारी पडला आणि 7-8 किलो वजन कमी केले. त्यादरम्यान त्याला व्हायरल इंफेक्शन झाले होते. तसेच, त्याने ज्या दबावाचा सामना केला, त्यामुळे सध्या तो मैदानात उतरण्याच्या स्थितीत नाहीये. दिवसाच्या शेवटी कुणाचा फायदा, तर कुणाचे नुकसान होते. आपल्याला त्याला मैदानात परत पाहण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.”
We hailed Rinku Singh for his sixes but other side of the story is this youngster, Yash Dayal.
He's not keeping well and lost 8-9kgs weight since that day. Praying for your comeback man. ❤️ pic.twitter.com/YCCmZD2Ujk
— ANSHUMAN🚩 (@AvengerReturns) April 25, 2023
Hardik Pandya said – "Yash Dayal was ill for 10 days after that KKR match and his weight also decreased by 8 to 9 Kg. But he is working hard and will back soon".
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 25, 2023
यश दयाल याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झालेल्या मोहित शर्मा हा शानदार गोलंदाजी करत आहे. त्याने 4 सामन्यात 6.15च्या इकॉनॉमी रेटने 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. यापैकी 17 धावा खर्च करत 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. मोहित हा फायदेशीर गोलंदाजी करण्यासोबतच अखेरच्या षटकात विकेट्सही घेत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जुन तेंडुलकरविषयी न्यूझीलंडच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘रोहितलाही माहितीये…’
पाय मोडल्यानंतर बेअरस्टोचे वादळी कमबॅक, 15 षटकार-चौकारांचा पाऊस पाडत ठोकल्या 97 धावा