भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सोमवारी (31 ऑक्टोबर) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला. ज्यामध्ये तुम्ही त्याच्या हॉटलची रूम पाहू शकता. त्याच्या बाथरूमपासून ते रूममधील प्रत्येक कोपरा न कोपरा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. झाले असे की त्याच्या या हॉटेल रूमचा व्हिडिओ त्याच्या परवाणगीविनाच शेयर केला होता. हे पाहून विराटला त्याच्या रागावर ताबा नाही मिळवता आला. यामुळे त्याने स्वत:हाच हा व्हिडिओ शेयर करत एकप्रकारे आपला राग व्यक्त केला.
विराट कोहली (Virat Kohli) याचे म्हणणे आहे की, हे त्याच्या खाजगी जीवनाचे/ प्रायव्हसीचे उल्लंघन आहे. हा व्हिडिओ पर्थ येथील असल्याचे समोर येत आहे. भारतीय संघ पर्थमध्ये थांबला होता. कारण भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान 30 ऑक्टोबरला सुपर 12चा सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारत पराभूत झाला.
विराटने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी समजू शकतो की मी चाहत्यांचा आवडता खेळाडू आहे. ते मला पाहण्यास नेहमीच उत्सुक असतात, मात्र हा व्हिडिओ भीतीदायक आहे. हे पाहून मला माझ्या खाजगी आयुष्याबाबत भीती निर्माण झाली आहे. जर मला माझ्या हॉटले रूममध्येच प्रायव्हसी मिळत नसेल तर बाकी ठिकाणी मी त्याची अपेक्षाही करू शकत नाही. मी अशा प्रकारच्या फॅनाटिज्मला नाही मानत. माझी विनंती आहे की, तुम्ही लोकांच्या खाजगी जीवनाची काळजी घ्या आणि त्याला कोणाच्याही मनोरंजनाचे साधन बनवू नका.’
विराटची ही पोस्ट त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने पण इंस्टाग्रामची स्टोरी म्हणून शेयर केली. तिलाही असाच अनुभव आल्याचे तिने म्हटले. या पोस्टबाबत तिनेही व्यक्त होताना म्हटले, ‘हे मानवी जीवनाचे संपूर्ण अपमान आणि उल्लंघन आहे. जर कोणी म्हणत असेल की तुम्ही सेलिब्रेटी असला तर अशा गोष्टींना सामोरे जावे लागेल मग तुम्हीही त्या वाईट प्रकाराचा एक भाग आहात’
विराटच्या या पोस्टला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) यानेही कमेंट केली आहे. त्याने म्हटले, ‘हे अतिशय चुकीच असून संपूर्णपणे अमान्य आहे.’
https://www.instagram.com/reel/CkXVWI6g7Ff/?utm_source=ig_web_copy_link
या स्पर्धेत भारताचा पुढील सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सं विरुद्ध सलग दोन विजय मिळवले होते. त्या दोन्ही सामन्यात विराटने अर्धशतकी खेळी केल्या होत्या. यामधील त्याने पाकिस्तानविरुद्ध केलेली नाबाद 82 धावांची खेळी उल्लेखनीय ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अन् ‘त्या’ दिवसाची भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद झाली
तब्बल 39 वर्षानंतर भारताने जिंकले फ्रेंच ओपन! सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टीला पुरूष दुहेरीचे विजेतेपद