जगभरातील अनेक देशांप्रमाणेच सध्या भारतही कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. सध्या भारतातील परिस्थिती बिकट होत आहे. रोज लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यातच वैद्यकिय सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच या विळख्यात सामन्य व्यक्तीपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण अडकले आहेत. याच महामीर्चाय संक्रमणामुळे ‘शुटर दादी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या नेमबाज चंद्रो तोमर यांचा आज (३० एप्रिल) मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपुर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. याबद्दल त्यांच्या ट्विटर हँडेलवर माहिती दिली गेली होती. ‘दादी चंद्रो तोमर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे,’ ट्विट करण्यात आले होते. अखेर ३ दिवस हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढा दिल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या.
दादी चंद्रो तोमर कोरोना पॉज़िटिव हैं और साँस की परेशानी के चलते हॉस्पिटल में भर्ती हैं । ईश्वर सबकी रक्षा करे – परिवार
— Dadi Chandro Tomar Memorial (@realshooterdadi) April 26, 2021
चंद्रो तोमर यांनी नेमबाजीमध्ये अनेक विक्रम केले होते. त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षांनंतर अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यांनी त्यांची बहिण प्रकाशी तोमर यांच्यासह अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. या दोन्ही तोमर भगिनींना जगातील सर्वात जेष्ठ नेमबाजांपैकी एक मानले जाते. तसेच त्यांच्या जीवनावर काहीवर्षांपूर्वी ‘सांड की आँख’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
अशी २ कारणे, ज्यामुळे रोहित शर्मा अन् विराट कोहलीची तुलना तर होणारचं
Covid-19: राजस्थान रॉयल्सनंतर आता ‘या’ आयपीएल संघाने दिला मदतीचा हात, केली १.५ कोटींची मदत