भारतीय नेमबाज शाहझर रिझवी इंटरनॅशनल शूटींग स्पोर्ट्स फेडरेशन ( आयएसएसएफ )च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने 10 मीटर एअर पिस्टोलतच्या क्रमवारीत हे स्थान मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या कोरीयामधील विश्वचषक स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले आहे.
रिझवी 1654 रेटिंग पॉइंट्सह रशियाच्या अर्तेम चेर्णौसोव (1046) आणि जपानच्या तोमोयुकी मत्सुदा (803) यांच्या पुढे आहे.
या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये अजून दोन भारतीयांचा समावेश आहे. यात जीतू राय हा सहाव्या तर प्रकाश मिथरवाल हा बाराव्या स्थानावर आहे.
याआधी रिझवीने मार्चमध्ये मेक्सिकोमधील गुअदलजर येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून जागतिक विक्रम केला होता.
महिलांमध्ये भारताकडून मनू भाकेर हि एकमेव महिला या क्रमवारीच्या पहिल्या दहामध्ये आहे. ती या क्रमवारीत 931 रेटिंग पॉइंट्सह चौथ्या स्थानावर आहे. तिने 2018च्या राष्ट्रकूल स्पर्धेत एेतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते.
तसेच पुरूषांच्या 10 मीटर एअर रायफलच्या क्रमवारीत रवी कुमार चौथ्या आणि दिपक कुमार नवव्या स्थानावर आहेत.
50 मीटर रायफल थ्री पोझीशनच्या पुरूष क्रमवारीत अखिल शेओरन चौथ्या आणि संजीव राजपूत आठव्या स्थानावर आहेत.
महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या पहिल्या पंधराच्या क्रमवारीत भारताचे तीन खेळाडू आहेत. यामध्ये राष्ट्रकूल स्पर्धा रौप्यपदक विजेती मेहूली घोष(सातव्या), अपूर्वी चंदेला(अकराव्या) आणि अंजूम मौदगील(बाराव्या) स्थानांवर आहेत.
तसेच अंजूम 50 मीटर रायफल थ्री पोझीशनच्या महिला क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम
–एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री!
–क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…
–आज चुकीला माफी नाही, पराभूत संघासाठी पुढचा प्रवास खडतर
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद
–धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!