पुणे । औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू हर्षदा निठवे हिने दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सोनेरी वेध घेत नेमबाजीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. तिने २१ वषार्खालील मुलींमध्ये २३६.३ गुणांची नोंद केली. ती औरंगाबाद येथील एमजीएम नेमबाजी अकादमीत संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. युविका तोमर (उत्तरप्रदेश) व श्वोता देवी (पंजाब) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक पटकाविले.
हर्षदा हिने आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत भरघोस पदकांची कमाई केली आहे. तिने शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदकांची लयलूट केली आहे. ती दररोज पाच तास सराव करीत आहे. तिचे वडीलांची खानावळ असून त्यामध्ये मिळणाºया उत्पन्नाद्वारेच तिच्या नेमबाजीसाठी खर्च केला जात आहे. हर्षदा हिला लहानपणापासून नेमबाजीची आवड असून शाळेत असताना ती नेमबाजी स्पर्धा पाहण्यासाठी जात असे. तेथूनच तिने नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिला आंतर शालेय स्पर्धांमध्ये यश मिळाल्यानंतर तिला घरच्यांकडून या खेळासाठी सहकार्य मिळाले आहे. ती सध्या अंबड येथील मत्स्त्योदरी महाविद्याालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे.
हर्षदा हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले, खरंतर या पेक्षा जास्त गुणांनी मी ही स्पर्धा पूर्ण करायला पाहिजे होती. अर्थात येथील सुवर्णपदकदेखील महत्त्वाचे आहे. आॅलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी भरपूर मेहनत करायची माझी तयारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी