कसोटी क्रिकेटचा इतिहास जवळपास १४४ वर्ष जुना आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघांना २-२ डाव खेळायला मिळतात आणि चेंडू खेळण्यास मर्यादा नसते, जो संघ विरोधी संघाचे दोन्ही डावात मिळून २० बळी मिळवतो त्या संघाला विजयाची अधिक संधी असते. पूर्वी कसोटी सामने ६ दिवस खेळले जात. कारण, एक दिवस हा विश्रांतीचा दिवस म्हणून ठेवला जात असे. मात्र, आता केवळ ५ दिवसांचा कसोटी सामने घेण्यात येतो.
हा सामना ठरला सर्वात कमी कालावधीचा
कसोटी सामने सामान्यतः पाच दिवसांचे खेळले जातात. परंतु, क्रिकेटच्या इतिहासात एक असा सामना देखील होऊन गेला जो केवळ दहा चेंडूमध्ये संपुष्टात आला. सन २००९ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात नॉर्थ साउंड स्टेडियमवर हा कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यातील नाणेफेक वेस्ट इंडीज संघाने जिंकली आणि इंग्लंडच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने केवळ १० चेंडू खेळले असताना वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांकडून गोलंदाजी करताना त्रास होत असल्याची तक्रार केली गेली.
हे होते कारण
वेस्ट इंडीजचे गोलंदाज रन-अप घेऊन धावत असताना त्यांचे पाय वाळूमध्ये रोवले जात होते. रन-अपच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू होती. ज्या कारणाने गोलंदाजांना योग्य पद्धतीने धावता येत नव्हते. यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पंचांकडे तक्रार केली आणि मॅच रेफरी ऍलन हर्स्टसुद्धा मैदानावर आले. रेफ्री हर्स्ट यांनी मैदानाची पाहणी केली. त्यानंतर हर्स्ट, दोन्ही मैदानी पंच व दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मैदानावर गोलंदाजी करणे धोकादायक होते, असा अहवाल हर्स्ट यांनी दिला.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे कर्णधार आपल्या खेळाडूंना दुखापत न व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. याच कारणाने त्यांनी सामना रद्द करण्यास परवानगी दिली. या अशा विचित्र कारणाने सामना रद्द झाला असला तरी, क्रिकेट इतिहासात त्याची सर्वात कमी कालावधीत चाललेला कसोटी सामना म्हणून नोंद केली गेली.
महत्त्वाच्या बातम्या –
वा बेटा कमाल केलीस! भारताचा अभिमन्यू बनला बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर, केला ‘हा’ विश्वविक्रम
“युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता”, माजी पाकिस्तानी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
“भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आम्ही सर्वात मजबूत संघ मैदानात उतरवू”, इंग्लिश कर्णधाराने फुंकले रणशिंग