Shpageeza क्रिकेट लीगमधील गुरुवारी १८ वर्षाच्या रहमानुल्लाह गुरबाजने मैदानात मोठा कहर केला. काबुल ईगल्सचा कर्णधार गुरबाजने ५० चेंडूत ९९ धावा केल्या. मात्र धावबाद झाल्यामुळे त्याला आपल्या शतकापासून १ धावेने वंचित राहावे लागले.
गुरबाजच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर काबुलने अमो शार्कस विरूद्ध निर्धारित षटकात २२३ धावा केल्या. त्यानंतर विजयाचा पाठलाग करताना अमोच्या संघाला फक्त १६२ धावा करता आल्या. आणि काबुलने ६१ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
१४ चेंडूत केल्या ७२ धावा
प्रथम फलंदाजीस आलेल्या काबुलचा सलामीचा फलंदाज गुरबाजने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टीकोन ठेवला. गुरबाजने ६२ मिनिटांपर्यंत मैदानात अराजकता निर्माण केली. त्याने ५० चेंडूंत ९९ धावा केल्या त्यापैकी त्याने ७२ धावा या केवळ १४ चेंडूत केल्या.
गुरबाजने त्याच्या आतिशी खेळीत ६ चौकार आणि ८ षटकार लगावले. मात्र तो शतकापासून वंचित राहिला. तो १३ व्या षटकातील तिसर्या चेंडूवर धावबाद झाला. कर्णधार गुरबाज व्यतिरिक्त समीउल्ला शिनवारीने १८ चेंडूत ४४ धावा आणि अजमतुल्लाह उमरजालने नाबाद ४१ धावा केल्या. तर शार्कच्या यमीन, अब्दुल वासी आणि बातिन शाह यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळवली.
#Match9 – Innings Break@TheKabulEagles: 222/5 (20)
Target:223🏏 @RGurbaz_21 99 (50)
🏏 @SamiShinwari45 44 (18)Naveed Ahmadzai Amo Sharks'
– Abdul Wasi 21/1 (4)
– Batin Shah 53/1 (4)#Etisalat4GSCL2020 #DaAtalanoLeague #KEvAS pic.twitter.com/dNFtDEegDa— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 10, 2020
२२४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमो शार्क्सचे फलंदाज काबूलच्या गोलंदाजी हल्ल्याचा सामना करू शकले नाहीत. संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. आणि सात धावांत त्यांनी पहिली विकेट गमावली. परंतु दरविश रसूलने ४७ चेंडूंत ७३ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याला अन्य फलंदाजाकडून मजबूत साथ मिळाली नाही. आणि निर्धारित षटकात ८ विकेट्सच्या बदल्यात फक्त १६२ धावा करता आल्या. काबूलच्या नांगलिया खरोटने २९ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर नीजत मसूद व अजमतुल्लाहा यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई सुपर किंग्जमध्ये रैनाची जागा घेणारा हा खास ‘टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन; शेन वॉटसनचा दावा
-प्रीती झिंटाच्या टीमच्या हाती यंदाही लागणार निराशा; दिग्गजाने केली भविष्यवाणी
-खुशखबर! प्रवीण कुमार, मुनाफ पटेल ‘या’ लीगमधून करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन
ट्रेंडिंग लेख-
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा