महिला प्रीमियर लीग 2024च्या फायनलमध्ये आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ विकेटने पराभव केला आहे. तसेच महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना हा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अंतिम सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांसमोर घुडघे टेकले आहेत.
यामुळे महिला प्रीमियर लीग 2024च्या फायनलमध्ये 18.3 षटकात दिल्लीचा संघ 113 धावांवर ऑलआऊट झाला आहे. तसेच या अंतिम सामन्यात आरसीबीच्या श्रेयंका पाटीलने ऐतिहासिक विक्रम केला आहे. याबरोबरच आरसीबी संघाकडून श्रेयांका पाटील हिने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. त्यासोबतच सोफी मोलिनक्सनेह महत्त्वाच्या क्षणी तीन विकेट घेतल्या आहेत.
या सामन्यात 21 वर्षीय श्रेयंका पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. आरसीबीसाठी ती सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने 3.3 षटकात 12 धावा देत चार विकेट घेतल्या आहेत. यासह श्रेयंका पाटील महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम स्पेल टाकणारी गोलंदाज ठरली. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या हेली मॅथ्यूजच्या नावावर होता. तसेच यंदाच्या मोसमात श्रेयांका पाटीलने सर्वाधिक 13 विकेट घेत पर्पल कॅपची मानकरी ठरली आहे. यामुळे वुमन्स प्रीमियर लीगमधील दुसऱ्या सीझनमध्ये बंगळुरूने विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.
दरम्यान या सामन्यात श्रेयंका पाटील व्यतिरिक्त सोफी मोलिनेक्सही अप्रतिम गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सोफी मोलिनेक्सने एकाच षटकात शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स आणि एलिस कॅप्से अशा महत्वांच्या विकेट्स घेत अंतिम सामन्याचे संपूर्ण चित्रच बदलून टाकले आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.
महत्वाच्या बातम्या –
- आरसीबीच्या विजयानंतर कर्णधार स्मृतीने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना, म्हणाली…
- आरसीबी चॅम्पियन बनल्यानंतर विराटने मैदानातच केला स्मृतीला व्हिडीओ कॉल, पाहा व्हिडिओ