---Advertisement---

श्रेयस अय्यरचे केकेआरचा प्रशिक्षक मॅक्युलमशीच झाले भांडण? Video व्हायरल

On: मंगळवार, एप्रिल 19, 2022 12:45 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला अखेरच्या षटकात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सोमावारी (१८ एप्रिल) झालेल्या या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने शानदार अर्धशतकी खेळी करत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचे प्रयत्न विफल ठरले. दरम्यान, तो जेव्हा बाद झाला तेव्हा रागात देखील दिसला होता. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

झाले असे की, या सामन्यात राजस्थानने कोलकातासमोर २१८ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरने ५१ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ४ षटकार ठोकले. पण त्याची ही खेळी युजवेंद्र चहलने संपुष्टात आणली. त्याने श्रेयसला पायचीत केले.

श्रेयस पायचीत झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना तो कोलकाताचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम याच्याशी वाद घालताना दिसला. खरंतर या सामन्यादरम्यान कोलकाताच्या संघातील फलंदाजी क्रमात अनेक बदल पाहायला मिळाले होते, ज्याबद्दल श्रेयस नाराज झाला आणि त्याने याबद्दल मॅक्यूलमला प्रश्न विचारले, असा कयास समालोचकांनी लावला होता. (Shreyas Iyer Angry at KKR Head Coach Brendon McCullum)

https://twitter.com/cric_big_fan/status/1516121024130998280

https://twitter.com/SlipDiving/status/1516125922419961856

या सामन्यात श्रेयस अय्यरने सलामीवीर ऍरॉन फिंचसह १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. पण फिंच ५८ धावांवर बाद झाला. तसेच नंतर श्रेयसही बाद झाला. या दोघांनंतर मात्र, कोणला फार काही करता आले नाही आणि कोलकाता डाव १९.४ षटकांत २१० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे कोलकाताला ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

तत्पूर्वी, कोलकाताने नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने ६१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त संजू सॅमसनने ३८ धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या –

चहल आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा १८ वा खेळाडू; याआधी ‘या’ १७ गोलंदाजांनी केलाय असा कारनामा

एकच नंबर! कोलकाताच्या मावी-कमिन्स जोडीचा बाऊंड्री लाईनजवळ अप्रतिम कॅच, पाहा Video

Video: चहलचा कहर! आयपीएलमध्ये पहिली हॅट्रिक घेत अनोखे सेलिब्रेशन, पाहा कशा गेल्या विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---