---Advertisement---

श्रेयसने ४० धावा केल्या अन् युवराजचा विक्रम मोडीत काढला, वाचा काय आहे विक्रम

On: सोमवार, जून 13, 2022 2:31 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१२ जून) खेळला गेला. या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४ गडी राखत मात केली आणि मालिकेत २-० ने आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत ४० रनांची खेळी करत भारताचा दिग्गज अष्टपैैलू खेळाडू युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला आहे. 

श्रेयस अय्यरने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ सामने खेळले आहेत ज्यात त्याने ३४ डावांमध्ये त्याने आतापर्यंत एकूण ८८५ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर त्याच्या पहिल्या ३४ डावात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. याआधी युवराज सिंग ३४ डावांमध्ये ८७९ धावांसह चौथ्या क्रमांकावर होता, मात्र आता तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या ३४ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली १३२७ धावांसह पहिल्या क्रमांकावर, केएल राहुल १२९३ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर सुरेश रैना ८९४ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारतासाठी पहिल्या ३४ डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज
१३२७ – विराट कोहली (Virat Kohli)
१२९३ – केएल राहुल (KL Rahul)
८९४ – सुरेश रैना (Suresh Raina)
८८५ – श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
८७९ – युवराज सिंग (Yuvraj Singh)

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट्स गमावल्या. एन्रीच नॉर्कियाने ३६ धावा खर्च करून दक्षिण आफ्रिकी संघासाठी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘अपेक्षा आहे, या खेळीमुळे माझी कारकिर्द लांबेल’, भारताविरुद्ध ८१ धावा करणाऱ्या क्लासेनचे लक्षवेधी विधान

भारताला हरवण्यासाठी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराने खेळला गेम, ‘या’ घातक खेळाडूचा केला वापर

भारत-दक्षिण आफ्रिकेतील सामन्याला ओडिसाच्या CM पटनायक यांनी लावली उपस्थिती, गांगुलीशीही गाठभेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---