---Advertisement---

भारीच ना! IPLचा शेवट होताच श्रेयस अय्यरने खरेदी केली लग्झरी कार, किंमत वाचून तोंडात घालाल बोटे

On: गुरूवार, जून 2, 2022 5:39 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम २९ मे रोजी संपला. या आयपीएल हंगामात नवीन विजेता मिळाला. हा विजेता संघ म्हणजे गुजरात टायटन्स होय. मात्र, जय- पराजयाचा सामना करत कोलकाता नाईट रायडर्स संघाला या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आयपीएल संपल्यानंतर आता भारतीय संघाचा फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नुकतीच नवीन कार विकत घेतली आहे. या कारची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचे गाडीसोबतचे फोटो शेअर लँडमार्क कार्स मुंबईने शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “नवीन मर्सिडीज-बेंझ जी६३ खरेदी केल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचे अभिनंदन. आम्‍ही तुमचे स्‍टार परिवारात स्‍वागत करतो आणि आशा करतो की, तुम्‍हाला तुमचा कव्‍हर ड्राईव्‍ह खेळण्यात जितका आनंद होतो, तितकाच आनंद तुम्‍हाला ही स्‍टार चालवण्यात येईल.”

https://www.instagram.com/p/CeOYBEBJKkd/?utm_source=ig_web_copy_link

अय्यरने विकत घेतलेली गाडी मर्सिडीज कंपनीची मर्सिडीज बेंझ एएमजी जी ६३ ३मॅटिक एसयूव्ही ही एसयूव्ही कार आहे. या गाडीची किंमत तब्बल २ कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. श्रेयसने विकत घेतलेली गाडी मर्सिडीज- जी ६३ ही जी वॅगन सीरिजमधील टॉप मॉडेल आहे. या गाडीच्या वेगाचा विचार केला, तर ही गाडी केवळ ४.५ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग पकडू शकते. त्यामुळे या गाडीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

दरम्यान, श्रेयसने सध्याच्या आयपीएल हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. कोलकाताचा कर्णधार असताना संघ यंदा प्लेऑफमध्ये प्रवेस करू शकलेला नाही. आयपीएळ २०२२च्या लीलावावेळी श्रेयसला कोलकाताच्या संघाने १२.२५ करोड रुपये देत संगात सामील करून घेतले होते. श्रेयसने यंदाच्या हंगामात १४ सामन्यांत ४०१ धावा काढल्या असल्या, तरी आपल्या खेळाने संघाला पुढे नेण्यास श्रेयस अयशस्वी ठरला आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

द्विपक्षीय टी२० मालिका बंद करा, म्हणजे एका वर्षात २ वेळा आयपीएल होईल; पाहा कोणी केलंय विधान

IPL 2022ची ट्रॉफी उंचावली, तरीही पुढच्या वर्षी गुजरातच्या ‘या’ ५ खेळाडूंची होणार हाकालपट्टी? पाहा यादी

काय सांगता! रँडी ऑर्टन मोडणार जॉन सीनाचा ‘तो’ जबरदस्त विक्रम, ऑलिम्पिक विजेत्या कर्ट अँगलचा विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---