रविवारी(८ नोव्हेंबर) आयपीएल २०२० चा क्वालिफायर २ चा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने १७ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी एक मजेशीर किस्सा घडला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर संघातील खेळाडूचे चक्क नावच विसरला होता. त्यावेळी त्याला हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने खेळाडूच्या नावाची आठवण करुन दिली.
झाले असे की नाणेफेकीवेळी दोन्ही कर्णधार मैदानावर आले होते. त्यानंतर अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी समालोचक मार्क निकोलस यांच्याशी तो त्याच्या संघाबद्दल बोलत होता. त्याचवेळी निकोलस यांनी त्याला अंतिम ११ च्या संघात काही बदल केला आहे का, असे विचारले. त्यावर तो म्हणाला, ‘आम्ही दोन बदल केले आहेत. प्रवीण दुबेला संधी दिली आहे. आणि अजून एक खेळाडू आहे, पण मी त्याचे नाव विसरलो.’ त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या वॉर्नरने त्याला शिमरॉन हेटमायरची आठवण करुन दिली. यानंतर अय्यरही त्याचे हसू लपवू शकला नाही.
या मजेशीर घटनेचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.
या सामन्यात दिल्लीने हैदराबादला १९० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला १७२ धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
….म्हणून मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवले, श्रेयस अय्यरने केला खुलासा
फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीने केली १३ वर्षांची प्रतिक्षा; पाहा अन्य संघांचा काय आहे रेकॉर्ड
IPL 2020 : या ५ कारणांमुळे मुंबई इंडियन्स जिंकू शकतात पाचवे विजेतेपद
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत