आयपीएल 2025 स्पर्धेदरम्यान पंजाब किंग्ससाठी नेतृत्व करणाऱ्या भारतीय खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केलेल्या शानदार कामगिरीसाठी मार्च महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार पटकावला आहे. श्रेयस अय्यरने न्यूझीलंडच्या जैकब डफी आणि रचिन रवींद्र यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत श्रेयस अय्यरने 243 धावा करून सर्वात जास्त धावा तर केल्याच त्याचबरोबर भारताच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. श्रेयसने हा पुरस्कार जिंकल्यानंतर, भारताने सलग हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे. शुबमन गिलने फेब्रुवारी महिन्यात हा पुरस्कार जिंकला होता. इतिहासात फक्त ही दुसरी वेळ आहे की, जेव्हा सलग दोन भारतीय पुरुष खेळाडूंनी हे अवॉर्ड जिंकले आहेत.
श्रेयसने मार्च महिन्यात तीन सामन्यात 57.33 च्या सरासरीने 172 धावा केल्या, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुपमध्ये न्युझीलँड विरुद्ध 98 चेंडूत 79 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार सामील होते. त्याचबरोबर त्याने उपांत्यफेरी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, त्याने 62 चेंडूत 45 धावा बनवल्या होत्या. तसेच अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 62 चेंडूत 48 धावा केल्या होत्या.
पहिल्यांदा 2021 मध्ये प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार सलग 3 भारतीय पुरुष खेळाडूंनी जिंकला होता. जानेवारी साठी ऋषभ पंत, फेब्रुवारी साठी आर अश्विन आणि मार्चसाठी भुवनेश्वर कुमारला हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून असे कधीच घडले नव्हते की, आयसीसीकडून हे पुरस्कार सलग 2 वेळा भारतीय खेळाडूंना दिला गेला. आता इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले आहे.
श्रेयस अय्यर प्लेयर ऑफ़ द मंथ पुरस्कार
फेब्रुवारी 2022
मार्च 2025
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी जॉर्जिया वोलने महिला कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार जिंकला आहे. तिने हमवतन अनुभवी एनाबेल सदरलँड आणि युएसएची चेतना प्रसाद यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला होता. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 3- 0 पराभूत केले होते, यामध्ये 21 वर्षांच्या जॉर्जिया वोलने महत्त्वाची कामगिरी केली होती.
तिने पहिल्या सामन्यात 31 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. दुसऱ्या टी20 सामन्यात 20 चेंडूत 36 धावा तसेच अंतिम सामन्यात 57 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. महिला कॅटेगरीमध्ये सलग चार वेळा ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने हा पुरस्कार जिंकला आहे.