---Advertisement---

दिलदार श्रेयस! रस्त्यावरील गरीब महिलेची मदत करून जिंकलं सर्वांचं मन

Shreyas iyer
---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर मैदानावरील त्याची शानदार कामगिरी आणि नेतृत्वगुणांसाठी ओळखला जातो. मात्र आता त्यानं एका वेगळ्या कारणानं लाखो लोकांचं मन जिंकलं आहे. श्रेयस अय्यरनं मुंबईच्या रस्त्यांवरील एका गरीब महिला फेरीवालीची मदत केली, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे.

श्रेयसला नुकतंच बांद्रातील एक सलून बाहेर स्पॉट करण्यात आलं. जसा तो सलून मधून बाहेर आला, तसा चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. एका चाहत्यानं बॅटवर आणि जर्सीवर श्रेयस अय्यरचा ऑटोग्राफ मागितला, जो त्यानं लगेच दिला. मात्र यानंतर जे झालं, ते अत्यंत खास होतं.

सलूनच्या बाहेर एक गरीब महिला फेरीवाली काहीतरी विकत होती. तिनं श्रेयसकडे मदतीची याचना केली. महिला श्रेयसजवळ येऊन काहीतरी बोलली आणि नंतर त्याचा कारपर्यंत पाठलाग केला. या दरम्यान श्रेयसनं महिलेला संयम राखण्याचा आणि तंबाखू न खाण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यानं या महिलेला काही पैसे दिले.

श्रेयस अय्यरच्या या वागणुकीनं सोशल मीडियावर चाहत्यांंचं मन जिंकलं आहे. जेव्हा श्रेयसनं या महिलेला मदत केली, तेव्हा तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. यानंतर श्रेयसनं महिलेशी हस्तांदोलनही केलं. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

श्रेयस अय्यर नुकत्याच संपलेल्या भारताच्या श्रीलंता दौऱ्यासाठी टीम इंडियाचा सदस्य होता. मात्र एकदिवसीय मालिकेत त्याची कामगिरी फारशी खास राहिली नाही. आता तो दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ‘ड’ संघाचा कर्णधार आहे. यापूर्वी त्यानं आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचा खिताब मिळवून दिला होता.

हेही वाचा – 

“गोलंदाज बॅटमागे लपत नाहीत, ते हुशार असतात”, जसप्रीत बुमराहनं ठोकला कर्णधारपदाचा दावा
मोहम्मद शमीचं भारतीय संघात पुनरागमन कधी होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
जर केकेआरनं रिटेन केलं नाही तर कोणत्या संघाकडून खेळेल रिंकू सिंह? स्वत: दिलं उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---