श्रीलंका येथे सुरू असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना सुरू झाला. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले गेले. मात्र, भारतीय संघासाठी ही चिंता वाढवणारी बाब ठरली.
अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले. भारतीय कर्णधाराने यावेळी संघात दोन बदल करत जसप्रीत बुमराह व केएल राहुल यांना संधी दिली. बुमराह मोहम्मद शमी याच्या जागी संघात आला. तर, राहुलने श्रेयस अय्यरची जागा घेतली.
अय्यर हा मार्च महिन्यापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. या स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून त्याने पुनरागमन केलेले. यामध्ये तो फारसा यशस्वी झालेला नव्हता. तर नेपाळविरुद्ध त्याला फलंदाजीचे संधी मिळाली नव्हती. या सामन्यात नाणेफेकीदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की,
“दुर्दैवाने आम्हाला श्रेयसला बाहेर बसवावे लागत आहे. त्याला अचानकपणे पाठीत वेदना होऊ लागल्याने हा निर्णय घेतला गेला. राहुल त्याच्या जागी खेळेल.”
अय्यर सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी बराच वेळ पुल शॉट मारण्याचा सराव करत असल्याचे सांगण्यात येते. त्याचीही दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
(Shreyas Iyer Injured Again Before Match Against Pakistan KL Rahul Replace Him)
हेही वाचाच-
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडेतील बादशाहत संपुष्टात, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1
IND vs PAK सामन्यापूर्वी रोहितसेनेला अख्तरची चेतावणी; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ