क्रिकेटटॉप बातम्या

NCA मधून आली टीम इंडियासाठी गुड न्यूज! श्रेयसची निवड फिक्सच, वाचा सविस्तर

आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची संघ निवड 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळते याकडे सर्वांची नजर लागलीये. असे असतानाच बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून (एनसीए) भारतीय संघ व चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय. प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर हा दुखापतीतून पूर्ण बरा झाला असून, त्याचा आशिया चषकासाठी संघात समावेश होऊ शकतो.

मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अय्यर याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. आयपीएलमधून त्याने माघार घेतली होती. त्यानंतर तो एनसीएत दाखल झालेला. तेथे पुनर्वसनातून जाताना त्याने वेगाने आपल्या दुखापतीवर काम केले. मागील अनेक दिवसांपासून भारताचा चौथ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज कोण हा प्रश्न विचारला जात आहे. यासाठी अय्यर याचेच नाव आघाडीवर असल्याचे समजते. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास त्यालाच पहिली पसंती असेल.

एनसीएमधून मिळत असलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी झालेल्या एनसीए येथील सराव सामन्यात त्याने तब्बल 38 षटके फलंदाजी केली. तसेच तो पूर्ण 50 षटके क्षेत्ररक्षण करताना देखील दिसला. त्यानंतर आता रविवारी आणखी एक सराव सामना खेळला जाईल. त्या सराव सामन्यात देखील तो अशाच प्रकारे आपले योगदान देताना दिसल्यास, 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या संघ निवडीत त्याचे नाव दिसेल.

आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने अय्यर हा चौथ्या क्रमांकाचा सक्षम फलंदाज मानला जात आहे. 2019 नंतर तोच सर्वाधिक वेळा या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसलेला. त्यामुळे आशिया चषकात त्याच्या नावाची वर्णी लागू शकते.

(Shreyas Iyer Might Include In Asia Cup Sqaud He Played Practice Match At NCA)

महत्त्वाच्या बातम्या-
‘ऋतुराजला नेट्समध्ये खेळताना पाहण्यासाठी पैसे देईल’, असे का म्हणाला दिग्गज अश्विन? लगेच वाचा
‘धाकड गर्ल’ अंतिम पंघलचे सोनेरी यश! सलग दुसऱ्यांदा बनली विश्वविजेती 

Related Articles