भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी स्टार फलंदाज श्रेयस अय्यर बुची बाबू स्पर्धेत खेळत आहे. मात्र या स्पर्धेत त्याची जुनी उणिव पुन्हा एकदा सर्वांसमोर आली.
स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या अय्यरनं पुन्हा एकदा उसळत्या चेंडूवर आपली विकेट गमावली. श्रेयस आऊट होताच टीकाकारांनी त्याच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. शॉर्ट बॉलविरुद्ध अय्यरची कमजोरी सर्वज्ञात आहे. त्याला गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. विरोधी गोलंदाजानं याचा पुरेपुर फायदा घेत त्याला अनेक वेळा बाद केलंय. आता 19 सप्टेंबरपासून सुरू होणारी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका पाहता श्रेयसबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
बुची बाबू स्पर्धेत तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हनविरुद्ध खेळताना श्रेयस अय्यरला काही विशेष कामगिरी करता आली नाही. श्रेयस पहिल्या डावात अवघ्या 2 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून 22 धावाच निघाल्या. दुसऱ्या डावात शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेळताना श्रेयस झेलबाद झाला. त्याच्या विकेटची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळूनही श्रेयसला भारतीय खेळपट्ट्यांवर उसळते चेंडू कसे खेळता येत नाहीत, असं चाहते विचारत आहेत.
He is shreyas iyer in buchi babu tournament
When journalists asked him about his short bowling issue , he got angered and gave cryptic reply to journalist
But it’s been 4 years and still he is not able to play short bowling even on indian pitches #shreyasiyer pic.twitter.com/3vaW2qR0K1
— Harsh shekhawat (@wordofshekhawat) August 30, 2024
भारतीय संघ गेल्या वर्षी जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा देखील श्रेयस शॉर्ट बॉल विरुद्ध संघर्ष करताना दिसला. आफ्रिकी गोलंदाजांनी त्याच्या या कमजोरीचा पुरेपूर फायदा उचलला. मालिकेतील दोन सामन्यात श्रेयसनं 13.67 च्या सरासरीनं केवळ 41 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शॉर्ट बॉलवर आऊट झाल्यानंतर श्रेयस दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी तत्कालीन फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासोबत नेट सराव करताना दिसला होता. त्यावेळी तो सुमारे 150 किलोमीटर वेगानं येणारे शॉर्ट बॉल खेळण्याचा सराव करताना दिसला. मात्र, सतत सराव करूनही शॉर्ट बॉल खेळताना श्रेयसला अडचणी येत आहेत. याचं ताजं उदाहरण बुची बाबू स्पर्धेत पाहायला मिळालं.
हेही वाचा –
मोहम्मद आमिरनं 2 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं शाहीन आफ्रिदीचं भविष्य! खराब कामगिरीनंतर जुना व्हिडिओ व्हायरल
घातक बाऊन्सर थेट मानेवरच आदळला, फलंदाजानं लगेच सोडलं मैदान; पाहा नक्की काय घडलं
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! बीसीसीआय या दोन नियमांचा आढावा घेणार