भारत आणि न्यूजीलंडमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतासाठी श्रेयस अय्यरने त्याचे कसोटी पदार्पण केले. त्याने कसोटी पदार्पण सामन्यात शतक केले. या सामन्यानंतर श्रेयस अय्यरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस म्हणाला आहे की, तो आता त्याचे प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना रात्रीच्या जेवणासाठी घरी आमंत्रित करू शकतो. श्रेयसने सांगितले की, त्याने पदार्पण सामन्यात शतक करून आमरे सरांचा शब्द पूर्ण केला आहे.
श्रेयसने सांगितल्याप्रमाणे त्याचे प्रशिक्षक आणि भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी त्याला सांगितले होते की, जेव्हा तो कसोटीमध्ये पदार्पण आणि शतक करेल, तेव्हाच ते त्याच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी येतील.
श्रेयस वर्चुअल पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘जेव्हा जेव्हा मी प्रवीण सरांकडे सरावासाठी जातो, तर ते म्हणातात की, तू आयूष्यात खूप काही मिळवले. एका आयपीएल संघाचा कर्णधार देखील राहिला आहे. भारतासाठी एवढ्या धावा केल्या. पण तुझी मुख्य यश तेच असेल, जेव्हा तू कसोटी कॅप मिळवशील.’
दरम्यान, प्रवीण आमरे यांनी देखील त्यांच्या कसोटी पदार्पणात शतकी खेळी केली होती. ते देखील दक्षिण अफ्रिका संघाविरोधात केले होते. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस अय्यरने देखील त्याच्या कसोटी पदार्पण सामन्यात शतकी खेळी केली आहे. श्रेयसने या सामन्याच्या पहिल्या डावात १७१ चेंडूंचा सामना केला आणि १०५ धावा केल्या. यामध्ये त्याने १३ चौकार आणि दोन षटकार देखील मारले.
या पदार्पण शतकानंतर श्रेयस सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी त्यांच्या कसोटी पदार्पणात शतक केले होते. श्रेयस भारतीय संघातील आतापर्यंतचा १६ वा खेळाडू ठरला, ज्याने कसोटी पदार्पणात शतक केले.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या कसोटीदरम्यान भारतीय पंचांचे निराशाजनक निर्णय, न्यूझीलंडचा सलामीवीर तीन वेळा बचावला
South Africa A vs India A: पहिल्या कसोटी पावसामुळे अनिर्णित; इश्वरनचे शानदार शतक, तर ९६ धावा
“टीम पेन संघात हवा कारण, तो जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे”