आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघांमध्ये मोठ्या कालावधीनंतर श्रेयस अय्यर पुनरागमन करत आहेत. श्रेयसची संघात निवड झाल्यानंतर तो कितपत तंदुरुस्त आहे असा प्रश्न विचारला जात होता. तसेच त्याला थेट संधी द्यावी का याविषयी देखील अनेक माजी क्रिकेटपटू चर्चा करत होते. मात्र, आता स्वतः श्रेयसने पुढे येत याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रेयसला मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोणत्याही प्रकारचा स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. तब्बल तीन महिने बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी पुनर्वसन कार्यक्रमातून जात होता. त्यानंतर आता तो पूर्ण तंदुरुस्त झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली.
बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रेयस म्हणाला,
“आता मी एकदम फिट आणि खेळायला तयार आहे. परत आल्याने मी खूप आनंद होतोय. सर्वांनी माझे अत्यंत चांगले स्वागत केले. सर्वांचे आनंदी चेहरे पाहून एक नवी प्रेरणा मिळाली.”
श्रेयस आशिया चषक व विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. अय्यरने भारतीय संघासाठी 20 वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. यामध्ये त्याने 805 धावा केल्या असून यादरम्यान त्याचे सरासरी 47.35 व स्ट्राईक रेट 95 पेक्षा जास्त राहिला आहे. या क्रमांकावर त्याच्या बॅटमधून दोन शतके व पाच अर्धशतके देखील आली आहेत. त्यामुळे श्रेयस याला या क्रमांकावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
(Shreyas Iyer Said Am Fully Fit For Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
कॅलिसचा क्लास 47 व्या वर्षीही कायम! 22 चेंडूवर ठोकले वादळी अर्धशतक, पाहा व्हिडिओ
अहमदाबादमध्ये होणार वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा, जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी