---Advertisement---

‘तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे…’, माजी सलामीवीराने वनडेत सूर्यकुमारसाठी सुचवली खास बॅटिंग पोझिशन

Suryakumar Yadav
---Advertisement---

भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाविषयी मागच्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. आगामी आशिया चषकासाठी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघात पुनरागमन केले आहे. अशात सूर्यकुमार यादवला संधी मिळणार की नाही हा पहिला प्रश्न आहे. सूर्यकुमारला संघात घेतले, तर तो कितव्या क्रमांकावर खेळणार हेदेखील पाहण्यासारखे असेल. अशातच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने सूर्यकुमार एका खास क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला दिला आहे.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज बनला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर त्याला 2021 मध्ये अखेर भारतासाठी पदार्पणाची संधी मिळालीच. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने स्वतःला सिद्ध केले. पण वनडे प्रकारात त्याला अद्याप लय सापडली नाही, असेच दिसते. आगामी वनडे विश्वचषक भारतात होणार असून सूर्यकुमार यादवकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत वसीन जाफर सूर्यकुमार यादवच्या फलंदाजी क्रमाविषयी बोलला. जाफरच्या मते सूर्यकुमारसाठी वनडे क्रिकेमटद्ये सहावा क्रमांक योग्य असेल. जाफर म्हणाला, “वनडे क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे कौशल्य हवे असते. सूर्यकुमार यादवने यावर काम केले पाहिजे. मला वाटते सूर्यकुमार यादवसाठी वनडे क्रिकेटमध्ये सहावा क्रमांक योग्य आहे. या क्रमांकावर तो आपल्याला हवे सते प्रदर्शन करू शकतो. वनडे क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याच्याकडे हा पर्याय आहे.”

जाफर आणि सूर्यकुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी एकत्र खेळले आहेत. याविषयी सांगताना जाफर म्हणाला, “तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे आणि त्याने आपले पदार्पण देखील माझ्यासमोर केले आहे. त्याच्याकडे खूप गुणवत्ता आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने चौथ्या क्रमांकावरून फलंदाजीला सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याची खेळी मोठ्या प्रमाणात बदलली आहे, पण त्याला चौथ्या क्रमांकाची सवय आहे. मला वाटत आहे की, टी-20 क्रिकेटमधून वनडे प्रकारासाठी स्वतःला तयार करणे, जाफरला अवघड जात आहे.”

2021मध्ये पदार्पण केल्यापासून सूर्यकुमारने आतापर्यंत 53 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 46.02च्या सरासरीने 1841 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये मात्र त्याची आखडेवारी समाधानकारक नाही. त्याने खेळलेल्या 26 वनडे सामन्यांमध्ये 24.33च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत. (Wasim Jaffer’s Suryakumar Yadav should play at number six in ODI cricket)

महत्वाच्या बातम्या – 
कॅलिसचा क्लास 47 व्या वर्षीही कायम! 22 चेंडूवर ठोकले वादळी अर्धशतक, पाहा व्हिडिओ
जोस बटलर डिविलियर्सचा विक्रम मोडणार? वनडेत सर्वात वेगवान शतकाबाबत काय म्हणाला इंग्लिश कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---