भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारी मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दिवस – रात्र सामना असणार आहे. तसेच मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना देखील याच मैदानावर होणार आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका १२ मार्च पासून खेळवली जाणार आहे. ती मालिका देखील याच मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय, इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. भारतीय टी -२० संघात निवड झालेले खेळाडू फॉर्ममध्ये येत आहे.
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारतीय टी -२० संघात निवड झालेल्या खेळाडूंनी आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई विरुद्ध महाराष्ट्र संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई संघाने ६ गडी राखून महाराष्ट्र संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. यात मुंबई संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने ९९ चेंडूत १०३ धावांची खेळी करत सामना मुंबई संघाला जिंकवून दिला.या खेळीत त्याने ९ चौकार आणि १ षटकार लगावला.
यश नाहर आणि आजिम काजी यांनी देखील झळकावले शतक
महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात फलंदाजी करतांना ५० षटकांच्या समाप्तीनंतर २८९ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडने १९ धावांची खेळी केली. त्यांनतर यश नाहर याने १३३ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ७ चौकरांच्या मदतीने ११९ धावांची खेळी केली . तर आजिम काजीने ११८ चेंडू खेळून १२ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने १०४ धावांची खेळी केली. तसेच मुंबई संघाकडून गोलंदाजी करतांना धवल कुलकर्णीने १० षटकात ४४ धावा देत ५ गडी बाद केले तर, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश आले.
मुंबईने ४७.२ षटकातच मिळवला विजय
दुसऱ्या डावात २८० धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबई संघाकडून सलामीसाठी आलेल्या यशस्वी जयस्वालने ४० धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉने ३४ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादव याने २९ आणि शिवम दुबेने ४७ धावांचे योगदान दिले. सरफराज खान १५ धावा करत नाबाद होता तर कर्णधार श्रेयस अय्यर हा सुद्धा ९९ चेंडूत १०३ धावा करत नाबाद राहिला आणि संघाने अवघ्या ४७.२ षटकातच सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने ‘असे’ केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ
भारतीय महिला संघ मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज; ‘या’ संघाविरुद्ध मायदेशात खेळणार मालिका
डे-नाईट टेस्टचा पहिलाच दिवस अक्षर पटेलने गाजवला! ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवले पहिले स्थान