---Advertisement---

मुंबईकर अय्यरचा फलंदाजीत बल्ले बल्ले! सलग २ सामन्यात झुंजार शतकं, आता इंग्लंडला पाजणार पराभवाचं पाणी 

On: शनिवार, फेब्रुवारी 27, 2021 2:42 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करणारे काही शिलेदार सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहेत. यात केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, श्रेयस अय्यर अशा खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील एक सामना शनिवारी (२७ फेब्रुवारी) राजस्थान विरुद्ध मुंबई संघात झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अय्यरने शतक झळकावले आहे. हे त्याचे विजय हजारे ट्रॉफीतील पहिलेवहिले नसून सलग दुसरे शतक आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईने १३ षटकात २ बाद ८३ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत २६ वर्षीय अय्यरने १०३ चेंडूत ११६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ षटकार आणि ११ चौकार मारले. अखेरच राजस्थानचा गोलंदाज रवी बिश्नोईने त्याला त्रिफळाचीत केले.

तत्पुर्वी महाराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही अय्यरने नाबाद शतकी खेळी केली होती. ९९ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकार मारत त्याने बिनबाद १०३ धावा केल्या होत्या.

महत्त्वाचे म्हणजे, हाच अय्यर इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेचा भाग आहे. टी२० मालिकेसाठी निवड झालेल्या भारतीय संघात त्याचा समावेश आहे. तसेच तो पुढील वनडे मालिकेतही खेळताना दिसू शकतो. सध्या भारत आणि इंग्लंड या उभय संघात कसोटी मालिका चालू आहे. ही मालिका संपल्यानंतर १२ मार्च ते २० मार्च दरम्यान पाच सामन्यांची टी२० मालिका होणार आहे.

अशात अय्यर विजय हजारे ट्रॉफीप्रमाणे इंग्लंडविरुद्धही आपली लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठमोळा केदार जाधव बरसला! १० चौकारांसह चोपल्या ‘इतक्या’ धावा, आता SRH ला जिंकून देणार जेतेपद

‘भारतीय जवानांच्या जीवापुढे क्रिकेट ही खुप छोटी गोष्ट’, पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यावरुन गंभीरची रोखठोक भुमिका

पराभवानंतर पाहुण्यांना आणखी एक धक्का! चौथ्या कसोटीपूर्वी ‘या’ धाकड खेळाडूची माघार, भरली मायदेशी उड्डाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---