वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी सपशेल निराशा केली. भारताचे तीन गडी अवघ्या ४० धावांमध्ये माघारी परतले होते. त्याचवेळी या मालिकेत सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळत असलेल्या श्रेयस अय्यर याने पुन्हा एकदा निराशा केली. सलग सहाव्या सामन्यात तो अपयशी ठरला.
स्वस्तात बाद झाला श्रेयस
सामन्याच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानात आला. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याचे तसेच पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येण्याचे आव्हान त्याच्यापुढे होते. मात्र, त्याने निराशा केली. ११ चेंडूंमध्ये १० धावा काढून अल्झारी जोसेफच्या चेंडूवर यष्टीरक्षक डेवॉन थॉमसच्या हाती झेल देत माघारी परतला.
सहाव्या सामन्यात ठरला अपयशी
या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका व वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० सामन्यांमध्ये कमालीच्या फॉर्ममध्ये असलेला श्रेयस आयपीएलनंतर अजिबात फॉर्ममध्ये दिसला नाही. श्रेयसने मागील सहा टी२० सामन्यांमध्ये पुरती निराशा केली आहे. त्याने या सामन्यांमध्ये अनुक्रमे १४, ०६, ००*, २८, ००, १० अशा धावा काढल्या आहेत. आगामी टी२० विश्वचषकाचा विचार केल्यास त अशीच खराब कामगिरी करत राहिला तर त्याची संघातील जागा धोक्यात येऊ शकते.
भारतीय संघ १३८ धावांवर सर्वबाद
प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या ते संघाला या सामन्यात पुरते अपयश आले. कर्णधार रोहित शर्मा गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव ही फारसे योगदान देऊ शकले नाहीत. रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी थोडाफार संघर्ष केला. मात्र, अखेर भारतीय संघ १३८ धावांवर सर्वबाद झाला. ओबेद मेकॉयने वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक ६ बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
अगोदर पिता आणि आता पती बनलाय ‘हा’ क्रिकेटपटू, थाटात पार पडलं शुभमंगल
शिखर धवनचा हट्टी शेफ! मालक सुट्टी देत नव्हता, पण तरीही घेतलीच
ना पाऊस ना वारा, तरीही भारत-विंडिज सामना लेट होणार, कारण वाचून हसून लोटपोट व्हाल






