भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा दुसरा टी२० सामना सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर रविवारी खेळला गेला. भारतीय संघ मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडीवर आहे. या सामन्यात विजय मिळवून, मालिकाविजय साजरा करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. त्याच अनुषंगाने, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देत चांगली सुरुवात केली होती.
भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
या दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक मॅथ्यू वेड याला सलामीला बढती देण्यात आली. डार्सी शॉर्ट व वेड यांनी ऑस्ट्रेलियाला तुफानी सुरुवात देत चार षटकांत ४० धावांची लूट केली. प्रामुख्याने वेड चांगलीच फटकेबाजी करत होता.
अय्यरचा अफलातून झेल
सलामीची जोडी त्रासदायक ठरत असतानाच आपला दुसरा सामना खेळणाऱ्या टी नटराजनने पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डार्सी शॉर्टला बाद करत भारताला पहिले यश मिळवून. नटराजनने टाकलेल्या चेंडूवर शॉर्टने डीपला लगावलेला फटका श्रेयस अय्यरने उत्तमरित्या झेलला. शॉर्ट ९ चेंडूत ९ धावा काढून माघारी परतला.
Shreyas playing so beautifully on his birthday!!!!
He made the catch look so easy, loving it!!#ShreyasIyer #HappyBirthdayShreyasIyer @ShreyasIyer15 #AUSvsIND pic.twitter.com/mw4gOHlKro
— Shivranjani (@shivranjanixo) December 6, 2020
https://twitter.com/bhat_hosanagara/status/1335503380328824833
https://twitter.com/AadityaKanchan/status/1335506470087979008
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९४ धावा केल्या आणि भारताला १९५ धावांचे आव्हान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नेतृत्त्व कसे करावे हे विराटने ‘या’ खेळाडूकडून शिकावे, मोहम्मद कैफची कोहलीवर टीका
भारताचा दिग्गज म्हणतो, शिखरबरोबर केएल राहुल नाही तर ‘या’ क्रिकेटरने यावे सलामीला
विराट ऐवजी रोहित शर्माला टी२० संघाचे कर्णधारपद देण्याची गरज नाही, भारतीय दिग्गजाचे मत
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
मराठीत माहिती- क्रिकेटर आरपी सिंग
भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस