आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये पंजाब किंग्सच्या (punjab kings) शानदार प्रदर्शनामागे संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरची (Shreyas iyer) खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. या हंगामात श्रेयसच्या कर्णधार पदाचे खूप कौतुक होत आहे. त्याच्या नेतृत्वात पंजाब पॉईंट्स टेबलमध्ये टॉप- 2 मध्ये त्यांचे स्थान निश्चित केले आहे. याचा अर्थ आहे की, पंजाब संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील . जी गोष्ट कोणत्याही संघासाठी दिलासा देणारी आहे.
श्रेयस अय्यरने फक्त कर्णधार भूमिकेतच नाही तर, फलंदाजीमध्ये सुद्धा शानदार प्रदर्शन केले आहे. त्यांचा संघ जेव्हा अडचणीत होता, तेव्हा त्याने संघाला सांभाळले आहे आणि काही वेळा त्याच्या पारीने पंजाबला सामना जिंकून दिलेला आहे. अशा परिस्थितीत पंजाबच्या या कर्णधाराबद्दल आयपीएलचा माजी दिग्गज खेळाडू रॉबिन उथप्पाने एक मोठे वक्तव्य केले आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
रॉबिन उथप्पाने (Robin uthhppa) म्हटले आहे की, श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) संघामध्ये तो सन्मान आणि ते महत्त्व मिळाले नाही, ज्याचा तो भागीदार होता. आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये श्रेयसच्या नेतृत्वाखाली केकेआरने (KKR) आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तरीसुद्धा श्रेयसला संघात ते महत्त्व देण्यात आले नाही, जे देण्याची गरज होती.
जिओ हॉटस्टार (jio hotstar) वर एका मुलाखतीदरम्यान उथप्पाने म्हटले, श्रेयस कायमच एक चांगला कर्णधार राहिलेला आहे. केकेआर संघात त्याच्या योगदानाला म्हणावे तितके महत्त्व देण्यात आले नाही. त्याने संघासाठी खूप काही केले आहे, तरीसुद्धा त्याचे महत्त्व समजून घेतले नाही. तरीही तो एका अशा संघांमध्ये गेला ज्या संघाची तेवढी उपलब्धी नव्हती आणि त्या संघाला त्याने आज टॉप वर पोहोचवले आहे. हे त्याचे नेतृत्व आणि त्याचे संघाप्रती असलेले योगदान दर्शवते.
उथप्पाच्या या वक्तव्यानंतर स्पष्ट होते की, श्रेयसने (shreyas iyer captain of punjab kings) स्वतःला एका कर्णधाराच्या भूमिकेत सिद्ध केले आहे. आता सर्वांच्या नजरा या गोष्टीवर आहेत की, पंजाब किंग्स संघाला तो पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देऊ शकेल का?






