---Advertisement---

आयपीएल २०२१ हंगामात हा खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्त्व

On: रविवार, मार्च 21, 2021 3:18 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 च्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ 10 एप्रिलपासून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपल्या मोहीमेस सुरूवात करणार आहे. या मोसमात कोणत्या खेळाडूला संघाचे कर्णधारपद दिले जाणार आहे, याबाबत दिल्ली संघाचे सीईओ यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली कॅपिटल संघाचे सीईओ विनोद बिष्ट यांनी श्रेयस अय्यरच संघाचा कर्णधार म्हणून कायम राहणार असल्याची पुष्टी केली आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ हा खेळाडूबरोबरच मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने प्रथमच आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सीईओ विनोद बिष्ट म्हणाले की, “जेव्हा आम्ही श्रेयस अय्यर यांना कर्णधार बनविले तेव्हा आम्ही त्याचे पूर्ण समर्थन केले. अय्यरने 2019 मध्ये दिल्लीच्या कॅपिटल्सचे नेतृत्व करताना संघाला तिसर्‍या क्रमांकावर नेले तर सन 2020 मध्ये संघाने अंतिम फेरी गाठली होती. तो एक कर्णधार म्हणून पुढे जात आहे. मला खात्री आहे की, त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी चांगली राहील.”

विनोद बिष्ट पुढे म्हणाले, “संघात येणारा कोणताही ज्येष्ठ खेळाडू, मग तो अजिंक्य रहाणे, आर अश्विन किंवा स्टीव्ह स्मिथ असो, यांच्यामध्ये सुद्धा युवा खेळाडूंचे नेतृत्व करण्याचे बरेच ज्ञान आहे. गेल्या तीन-चार वर्षांत आम्ही एक युवा संघ तयार केला असून यातून खेळाडूंची प्रगती झाली आहे.”

आयपीएल 2021 मधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे साखळी फेरीचे सामने :
10 एप्रिल – वि चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई (सायंकाळी 7:30)
15 एप्रिल – वि राजस्थान रॉयल्स, मुंबई (सायंकाळी 7:30)
18 एप्रिल – वि किंग्ज इलेव्हन पंजाब मुंबई (दुपारी 3:30)
20 एप्रिल – वि मुंबई इंडियन्स, चेन्नई (सायंकाळी 7:30)
25 एप्रिल – वि सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई (सायंकाळी 7:30)
27 एप्रिल – वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, अहमदाबाद (सायंकाळी 7:30)
29 एप्रिल – वि कोलकाता नाइट रायडर्स, अहमदाबाद (सायंकाळी 7:30)
2 मे – वि किंग्ज इलेव्हन पंजाब , अहमदाबाद (सायंकाळी 7:30)
8 मे – वि कोलकाता नाइट रायडर्स, अहमदाबाद (दुपारी 3:30)
11 मे – वि राजस्थान रॉयल्स, कोलकाता (संध्याकाळी 7:30)
14 मे – वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता (संध्याकाळी 7:30)
17 मे – वि सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता (संध्याकाळी 7:30)
21 मे – वि चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता (संध्याकाळी 7:30)
23 मे – वि मुंबई इंडियन्स, कोलकाता (दुपारी 3:30)

आयपीएल 2021 साठीचा दिल्ली कॅपिटल संघ:

श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रीषभ पंत, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, एनरीक नोर्खिया, प्रवीण दुबे , ख्रिस वॉक्स, टॉम करन, स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, लुकमान हुसेन मेरीवाला आणि एम. सिद्धार्थ.

महत्त्वाच्या बातम्या –

‘हे’ दोन भारतीय खेळाडू टी२० विश्वचषकात खेळण्यास सज्ज, सचिन तेंडुलकरचा व्यक्त केले मत 

फायनलमध्ये सचिन तेंडुलकरच्या टीम इंडियाला पराभूत करु, ‘या’ श्रीलंकन खेळाडूने व्यक्त केला विश्वास

‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---