---Advertisement---

MI vs PBKS: श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी, ‘हा’ विक्रम करणारा ठरला एकमेव कर्णधार!

On: सोमवार, जून 2, 2025 8:37 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) च्या क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला 5 विकेट्सने पराभूत करून अंतिम सामन्यात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. (Punjab kings vs mumbai indians, qualifier 2) जिथे आता पंजाबचा सामना आरसीबीशी (3 जून) रोजी होईल. क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्सचा (punjab kings) कर्णधार श्रेयस अय्यरने (shreyas iyer created history) इतिहास रचला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी केली होती आणि 203 धावा केल्या होत्या. त्यानंतर पंजाबने 19 षटकात 5 विकेट गमावून हे लक्ष प्राप्त केले. पंजाबकडून श्रेयस अय्यरने 87 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

श्रेयस अय्यर (shreyas iyer) आयपीएल इतिहासातील एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने 3 वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या फायनल फेरीमध्ये पोहोचवले आहेत. याआधी श्रेयसने कर्णधार पद भूषवत 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) आणि 2024 मध्ये केकेआर (kolkata knight riders) आणि आता पंजाब किंग्सला त्याने अंतिम सामन्यात पोहोचवले आहे.

याशिवाय अय्यर टी 20 क्रिकेट इतिहासात भारतातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. श्रेयस आता टी20 फायनलमध्ये सर्वाधिक संघांचे नेतृत्व करणारा देखील भारतीय कर्णधार ठरला आहे.

टी 20 फायनलमध्ये सर्वाधिक संघाचे नेतृत्व करणारे भारतीय कर्णधार

4 श्रेयस अय्यर
2 महेंद्र सिंग धोनी
2 रोहित शर्मा

या शिवाय श्रेयस अय्यर प्लेऑफमध्ये तीन वेळा 50 + धावा करणारा आयपीएल कर्णधार देखील ठरला आहे. याआधी 2020 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दुबईमध्ये 65 धावांची नाबाद पारी त्याने खेळली होती.

श्रेयस अय्यर आयपीएल हंगामात पंजाबकडून सर्वात जास्त षटकार झळकावणारा फलंदाज देखील ठरला आहे. या हंगामात श्रेयसने 39 षटकार झळकवण्याचा कारनामा केला आहे. याआधी पंजाब किंग्सकडून हा विक्रम ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) याच्या नावावर होता. ग्लेन मॅक्सवेलने 2013 च्या हंगामात 36 षटकार झळकावले होते.

आयपीएल हंगामात पंजाबसाठी सर्वाधिक षटकार
39 श्रेयस अय्यर (2025)
36 ग्लेन मॅक्सवेल (2013)
34 ख्रिस गेल (2019)
34 लियाम लिविंगस्टोन (2022)
32 के एल राहुल (2018)

पंजाब किंग्स आयपीएल इतिहासात मुंबई विरुद्ध 200 धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---