भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात नुकतीच 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात आली. ही मालिका भारतीय संघाने 2-1ने खिशात घातली. आता या मालिकेनंतर उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना गुरुवारी (दि. 6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याने अफलातून फलंदाजी केली. त्याने या सामन्यात खणखणीत अर्धशतक झळकावले. त्याच्या मागील 5 डावांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात सातत्य दिसून येते. चला तर त्याबद्दल जाणून घेऊया.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील पहिल्या वनडे (First ODI) सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 40 षटकांचा ठेवण्यात आला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 40 षटकात 4 विकेट्स गमावत 249 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात सावकाश झाली. 17.4 षटकात 4 विकेट्स 51 अशी भारताची धावसंख्या होती. मात्र, नंतर पाचव्या स्थानी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आला आणि त्याने सामन्याचा कायापालट केला.
5⃣0⃣-run stand! 👏 👏
A cracking half-century partnership between @ShreyasIyer15 & @IamSanjuSamson. 👌 👌#TeamIndia move past 1⃣0⃣0⃣. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/d65WZUUDh2 #INDvSA | @mastercardindia pic.twitter.com/GuEHxpEYQS
— BCCI (@BCCI) October 6, 2022
श्रेयस अय्यरचे अर्धशतक
श्रेयस अय्यर याने यावेळी फलंदाजी करताना 37 चेंडूत 50 धावा केल्या आणि आपले कारकीर्दीतील 12वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. या धावा करताना त्याने 8 चौकारही मारले. मागील 5 वनडे सामन्यांमधील अय्यरचे हे चौथे अर्धशतक होते. त्याने सर्वात पहिले अर्धशतक हे अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले होते. त्याने यावेळी 111 चेंडूत 80 धावा चोपल्या होत्या. यानंतर त्याच्या बॅटमधून दुसरे अर्धशतकही वेस्ट इंडिजविरुद्ध आले होते. यावेळी त्याने त्रिनिदाद येथे खेळताना 57 चेंडूत 54 धावा चोपल्या होत्या. पुढे त्याने याच मैदानावर खेळताना वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरे अर्धशतक झळकावले होते. यावेळी त्याने 71 चेंडूत 63 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने त्रिनिदादमध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध 34 चेंडूत 44 धावांची खेळी केली होती. यावेळी त्याला अर्धशतक करता आले नव्हते. मात्र, त्याने लक्षवेधी फलंदाजी केली होती.
श्रेयस अय्यरची मागील 5 वनडे सामन्यातील कामगिरी-
50 (37) विरुद्ध, दक्षिण आफ्रिका (लखनऊ, 2022)*
44 (34) विरुद्ध, वेस्ट इंडिज (त्रिनिदाद, 2022)
63 (71) विरुद्ध, वेस्ट इंडिज (त्रिनिदाद, 2022)
54 (57) विरुद्ध, वेस्ट इंडिज (त्रिनिदाद, 2022)
80 (111) विरुद्ध, वेस्ट इंडिज (अहमदाबाद, 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हृदय जिंकलंस भावा! ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी रोहितने महिला चाहतीचा दिवस केला खास, व्हिडिओ पाहाच
वनडे पदार्पणात ऋतुराजचा ‘फ्लॉप शो’! 42 चेंडूत अवघ्या 19 धावा करत धरली तंबूची वाट