-पराग कदम
श्री केदार वाघजाई यात्रेनिमित्ताने दि १९ फेब्रुवारी २०१९ ला एक दिवसीय समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोयना पुनर्वसन क्षेत्र व दसपटी विभागातील विक्रमी ३२ संघांनी भाग घेऊन आपली कसब पणाला लावली होती.
उपउपांत्य फेरीपासून अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. परीक्षित शिंदेच्या सर्वोत्तम चढाईच्या जोरावर शेवटची दोन मिनिटे बाकी असताना ३ गुणांनी पिछाडीवर असलेल्या कादवड संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या उपउपांत्य फेरीत ओवळी देऊळवाडी संघाने सिद्धिविनायक कळकवणे संघावर सहज विजय मिळवला.
तिसऱ्या उपउपांत्य फेरीत तरुण मंडळ उचाट संघाने जय भवानी नवतरुण करजावडे संघावर सहज विजय मिळवला. चौथा उपउपांत्य फेरीचा सामना जय भवानी तरुण मंडळ कारजावडे भवानीनगर १७ – १७ केदारनाथ कोयनावेळे बरोबरीत सुटला. ५-५ चढाईत केदारनाथ वेळे संघाने ३-५ गुणांनी विजय मिळवला.
उपांत्य फेरीत कादवडच्या परीक्षित शिंदेला ओवळी देऊळवाडीच्या सुजित कदम, अक्षय मोरे यांनी बहारदार पक्कडी करीत जेरीस आणले व ओवळी देऊळवाडीला अंतिम फेरीत दाखल केले. दुसऱ्या उपांत्य फेरीत केदारनाथ कोयनावेळेच्या निखिल व ओमकार या कदम बंधूंच्या दमदार खेळाच्या जोरावर सहज अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना केदारनाथ कोयनावेळे विरुद्ध ओवळी या बलाढ्य संघामध्ये झाला मध्यंतराला केदारनाथ १० विरुद्ध ओवळी ९ नाममात्र १ गुणांची आघाडी केदारनाथकडे होती. दुसऱ्या सत्रात निखिल कदमने चढाईत तर ओमकार कदम ने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करीत सामना केदारनाथच्या बाजूने झुकवला शेवटच्या पाच मिनिटे शिल्लक असताना केदारनाथ २२-१३ ओवळी ९ गुणांची आघाडी केदारनाथकडे होती.
शेवटच्या पाच मिनिटांमध्ये ओमकार सकपाळने चढाई मध्ये गुण कमवत जवळजवळ सामना शेवटच्या मिनिटाला २१ विरुद्ध २२ गुणांवर आणला शेवटची केदारनाथ चढाई डु अँड डाय चढाईला ला ओमकार कदम ने गुण घेत अटीतटीच्या लढाईत केदारनाथ कोयनावेळे संघाला सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत विजयश्री प्राप्त करून दिली.
स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू श्री निलेश शिंदे, पुनर्वसन उपाध्यक्ष मंत्री श्री माधवजी भंडारी, आमदार सुनीलजी शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश शिंदे श्री शेखर शिंदे, श्री अजय शिंदे व स्पर्धचे नियोजक श्री चंद्रकांत मोरे, समालोचक श्री मोहन पाडावे या सर्वांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
सर्वोत्तम खेळाडु:- सुजित कदम (ओवळी देऊळवाडी)
सर्वोत्तम चढाई:- निखिल कदम (केदारनाथ कोयनावेळे)
सर्वोत्तम पक्कड:- ओमकार कदम (केदारनाथ कोयनावेळे)