---Advertisement---

गेल्या ६ वर्षांपासून पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या क्रिकेटरची निवृत्ती; म्हणाला, “मीडिया बना सकती है तो बिगाड..”

On: शनिवार, फेब्रुवारी 20, 2021 10:40 AM
---Advertisement---

श्रीलंका संघासाठी २५ कसोटी सामने, २४ एकदिवसीय सामने आणि १ टी२० सामना खेळलेला. तसेच आपल्या धारदार गोलंदाजीने श्रीलंकन संघाला अनेक सामने जिंकवून देणारा दिग्गज गोलंदाज, गेल्या ६ वर्षांपासून संघात परतण्याची वाट पाहत होता. परंतु त्याला पुन्हा संघात येण्याची संधी मिळाली नाही. शेवटी या ३७ वर्षीय गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१५ पासून श्रीलंका संघासाठी खेळण्याची संधी न मिळाल्याने दिग्गज गोलंदाज धम्मिका प्रसाद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डला याबाबतची माहिती दिली होती. त्यांनतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हॅन्डलवर ट्विट करत त्याची निवृत्तीची माहिती दिली.

प्रसादच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही क्षणांची झलक दाखवणारा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, धम्मिका प्रसादने अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

निवृत्ती घेतल्यानंतर धम्मिका प्रसाद झाला भावुक
निवृत्ती घेतल्यानंतर प्रसाद म्हणाला की, “मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मार्वन अट्टापट्टू तो व्यक्ती होता, ज्याने मला एसएससीमध्ये बोलवले होते. तसेच मला माइकल डि जोएसा आणि महेंद्रा हालांगोडा या लोकांकडून खूप मदत मिळाली. मला खूप लोकांचे आभार मानायचे आहेत. परमेश्वर, माझे आई-वडील, माझी पत्नी, माझी शाळा, सर्व प्रशिक्षक, पीच क्युरेटर, संघातील सर्व खेळाडू, माझे प्रशंसक आणि मीडिया सुद्धा.”

“याखेरीज मी एक गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट माहिती झाली होती की, मीडिया तुम्हाला उंचावर नेऊ शकते आणि खालीदेखील पाडू शकते. त्या दिवसापासून मी कुठल्याही पत्रकारासोबत वाद नाही घातला. मी त्यांना नेहमी चांगलीच वागणूक देत आलो,” असे त्याने शेवटी सांगितले.

धम्मिका प्रसादची कामगिरी
धम्मिका प्रसाद याने श्रीलंकन संघासाठी खेळलेल्या एकूण २५ कसोटी सामन्यात ४७६ धावा केल्या आहेत. तसेच ७५ गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे. तसेच २४ एकदिवसीय सामन्यात १२८ धावा आणि ३२ गडी बाद केले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक मात्र टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ज्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

अरे व्वा! अवघ्या ५० रुपयांत पाहता येणार ‘मास्टर ब्लास्टर’ची लाईव्ह फलंदाजी; जाणून घ्या वेळ, ठिकाण आणि सर्वकाही

खुशखबर! आयपीएल २०२१चे साखळी फेरी सामने होणार महाराष्ट्राच्या राजधानीत, तर प्लेऑफ ‘या’ शहरात?

नक्की १५ कोटी म्हणजे किती रे भावा? आरसीबीने खरेदी केलेल्या जेमिसनला लिलावानंतर पडला प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---