---Advertisement---

धक्कादायक! एकाच महिन्यात आयसीसीने तिसरा क्रिकेटपटू केला बॅन, ‘या’ दिग्गजावर तब्बल ६ वर्षांचे प्रतिबंध

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 12:03 PM
---Advertisement---

बुधवारी (२८ एप्रिल) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू नुवान झोयसा याच्यावर बंदी घातली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्याला तब्बल ६ वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे.

आयसीसीने याआधीच ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी माजी श्रीलंकन क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक नुवान झोयसाला निलंबित केले होते. त्यामुळे त्याच्या बंदीचा कालावधी ३१ ऑक्टोबर २०१८ पासून सुरू झाला आहे.

आयसीसीने माहिती दिली आहे की संपूर्ण सुनावणीनंतर आणि लेखी व तोंडी युक्तिवादानंतर न्याय समीतीने त्याला काही आरोपांसाठी दोषी ठरवले आहे. ते आरोप असे की कलम २.१.१ नुसार एखाद्या सामन्याचा निकाल किंवा सामन्याचा एखादा भाग फिक्स करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करण्याच्या कराराचा भाग असणे.

त्याच्यावर दुसरा आरोप २.१.४ कमलनुसार असा आहे की, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एखाद्या सदस्याला २.१ नियमाचा भंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा प्रलोभन देणे किंवा विणवनी करणे.  त्याचबरोबर कलम २.४.४ नुसार त्याच्यावर तिसरा आरोप लावण्यात आला आहे भ्रष्टाचार संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याची कोणतीही माहिती पुरवण्यासही त्याने अक्षमता दाखवली आहे.

याबरोबरच नुवान झोयसावर आयसीसीने इमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) वतीने आरोप लावला आहे की, टी१० लीगच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेमधील तीन कलमांचे उल्लंघन केले आहे. या आरोपावरील कारवाई अजून सुरु आहे.

https://twitter.com/cricbuzz/status/1387289631876542464?s=20

आयसीसीने यापुर्वी एप्रिल महिन्यातच श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतेगेवर बंदी घातली होती. त्याला ८ वर्षांसाठी क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. तत्पुर्वी आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक हिथ स्ट्रिकवरही ८ वर्षांची बंदी घातली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

DCच्या गोलंदाजाकडून मोठी चूक झाली, नशीब पंचांनी फक्त वॉर्निंग दिली; नाहीतर पूर्ण संघाला…

मोठी बातमी! महिला आयपीएल २०२१ सुरू होण्यापुर्वीच संकटात, ‘या’ कारणामुळे हंगाम होणार स्थगित?

कौतुकास्पद! धुव्वादार खेळीने जिंकवला सामना, तरीही स्वत:ला नव्हे ‘या’ खेळाडूला डिविलियर्सने म्हटले मॅच विनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---