INDWvsENGW Test: भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील एकमेव कसोटी सामना गुरुवारपासून (दि. 14 डिसेंबर) नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून एक-दोन नाही, तर 3 खेळाडूंनी पदार्पण केले आहे. यातील दोन फलंदाज, तर एक गोलंदाज आहे. फलंदाज म्हणून जेमिमा रॉड्रिग्ज आणि शुभा सतीश यांनी पदार्पण केले आहे, तर गोलंदाज म्हणून रेणुका सिंग खेळत आहे. दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच दिवशी आपली छाप सोडली. मात्र, गोलंदाजीची वेळ आज येण्याची शक्यता कमी आहे. जर विकेट्स पडल्या, तर रेणुका गोलंदाजी करताना दिसेल.
शुभा सतीशचे अर्धशतक
शुभा सतीश (Shubha Satheesh) हिच्याविषयी बोलायचं झालं, तर तिने शानदार खेळ केला. भारतीय महिला (Indian Women) संघाला पहिला धक्का लवकर बसला होता. अशात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शुभाने 76 चेंडूंचा सामना करताना 13 चौकारांच्या मदतीने 69 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिला सोफी एक्लेस्टोनने नॅट सायव्हर ब्रंटच्या हातून झेलबाद केले. तिने जेमिमा रॉड्रिग्ज (Jemima Rodrigues) हिच्यासोबत शतकी भागीदारी केली. त्यांच्यात 146 चेंडूत 115 धावांची भागीदारी झाली. यावेळी शुभाचा स्ट्राईक रेट हा 90.79 इतका होता. कोणत्याही नवीन फलंदाजासाठी कसोटीत इतक्या वेगाने घावा करणे कठीण असते, पण शुभाला पाहून असे वाटले की, हे तिच्यासाठी खूपच सोपे आहे.
दुसरीकडे, जेमिमाबद्दल बोलायचं झालं, तर तिला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील दांडगा अनुभव आहे. त्याचाच फायदा तिला कसोटीत मिळाला. जेमिमाने 82 चेंडूत अर्धशतक साजरे केले. तिने तिच्या खेळीत 99 चेंडूंचा सामना करताना एकूण 68 धावा चोपल्या. जेमिमा लॉरेन बेल हिच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाली. तिच्या खेळीत 11 चौकारांचा समावेश होता. 23 वर्षीय जेमिमा दीर्घ काळापासून भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. तिने आतापर्यंत 24 वनडे आणि 89 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
Fifty for Jemimah Rodrigues on her Test debut.
– She came when India was under huge pressure, batting at the iconic number 4 position and she has played a classic knock. pic.twitter.com/DRCVgMXgqm
— Johns. (@CricCrazyJohns) December 14, 2023
भारताची धावसंख्या 250च्या पार
या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, संघाच्या दोन विकेट्स सुरुवातीलाच पडल्या. यानंतर शुभा आणि जेमिमाने वेगाने धावा करत संघाची धावसंख्या 150च्या पार नेली. भारतीय संघाने 56 षटकांच्या खेळापर्यंत 4 विकेट्स गमावत 261 धावा केल्या. यादरम्यान हरमनप्रीत कौर (34) आणि यास्तिका भाटिया (38) क्रीझवर नाबाद आहेत. (shubha satheesh and jemimah rodrigues scored half centuries in the debut test match vs england team)
हेही वाचा-
माजी दिग्गज वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘मी बाबरला कर्णधारपद…’
धक्कादायक! किडनीच्या ‘या’ गंभीर आजाराचा सामना करतोय Cameron Green, 12 वर्षांपेक्षा जास्त…