भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (10 डिसेंबर) खेळला जात आहे. भारताने या सामन्यात नाणेपेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघ मोठी खेळी करू शकला नाही. निर्धारीत 20 षटकांमध्ये इंग्लंडने 126 धावांपर्यंत मजल मारली आणि सर्व विकेट्स गमावल्या.
इंग्लंडसाठी या सामन्यात कर्णधार हेदर नाईट हिने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. एमी जोन्स हिने 25 धावांचे योगदान दिले. भारतीय संघासाठी युवा फलंदाज सायका इशाक आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या. अमनजोत कौर आणि रेणुका सिंग यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. (IND vs ENG England team all out for 126 runs)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, तीतस साधू, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक.
इंग्लंड – सोफिया डंकले, माइया बाउचियर, ऍलिस कॅप्सी, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), डॅनियल गिब्सन, बेस हीथ, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, माहिका गौर.
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीग 2023मध्ये जीएम टायफुन्स, रॉयल स्टॅलियन्स संघांचा दुसरा विजय
‘रोहित टी-20 विश्वचषकात नेतृत्व करू शकतो, पण…’, कर्णधाराच्या फॉर्मबाबत गंभीरचे मोठे विधान