भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघासाठी सलामीला आलेल्या युवा शुबमन गिल याने द्विशतक साजरे केले. आपल्या केवळ 19 सामन्यांच्या वनडे कारकिर्दीत त्याने अनेक मोठे पराक्रम करून दाखवले आहेत.
भारतीय अंडर 19 संघाने 2018 मध्ये न्यूझीलंड येथे झालेला वनडे विश्वचषक आपल्या नावे केला. त्या विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला गिल सर्वाधिक धावा ठोकत स्पर्धेचा मानकरी ठरलेला. त्यानंतर वर्षभरात त्याला भारताच्या वरिष्ठ संघात संधी देण्यात आली. 2019 जानेवारीमध्ये त्याने न्यूझीलंडमध्येच वनडे पदार्पण केले होते. त्या दौऱ्यावर दोन सामने खेळल्यानंतर तो बराच काळ संघातून बाहेर राहिला. मात्र, मागील वर्षी त्याने पुनरागमन करत सलामीवीर म्हणून एक योग्य पर्याय उपलब्ध करून दिला.
झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकांमध्ये त्याने चमकदार कामगिरी करत मालिकावीराचे पुरस्कार आपल्या नावे केले. मात्र, बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती. परंतु, श्रीलंकेविरुद्ध त्याने पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात 60 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकावले. त्यानंतर आता थेट द्विशतक पूर्ण करत त्याने सलामीवीराच्या दुसऱ्या जागेसाठी सर्वात पुढे पाऊल टाकले आहे.
त्याने आतापर्यंत आपल्या वनडे कारकिर्दीत 19 सामने खेळताना 1102 धावा केल्या आहेत. भारतासाठी सर्वात जलद 1000 वनडे भावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम त्याने या सामन्यात आपल्या नावे केला. त्याची सरासरी सध्या 68.88 अशी अप्रतिम राहिली आहे. तर स्ट्राईक रेटही 109 पेक्षा जास्त राहिलाय. यात तीन शतके व पाच अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या गिल केवळ 23 वर्षांचा असल्याने तो पुढील 15 वर्ष भारतीय क्रिकेटची अशाच प्रकारे सेवा करू शकतो.
(Shubham Gill Extraordinary ODI Career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने मैदान मारलं! शुबमनचे न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी द्विशतक, गोलंदाजांची मोडली कंबर
तूच रे पठ्ठ्या! गिलने शतक ठोकताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, विराट अन् धवनलाही टाकले मागे