क्रिकेटटॉप बातम्या

श्रीलंकेला तर धुतलं, आता टीम इंडियापुढं न्यूझीलंडचं आव्हान; वाचा वनडेत कोण कुणावर आहे वरचढ

भारतीय क्रिकेट संघाने नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका जिंकून केली. यानंतर आता भारतीय संघापुढे न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंड संघदेखील 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौरा करणार आहे. आधी वनडे मालिका खेळली जाईल, त्यानंतर टी20 मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील पहिला वनडे सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वी आपण उभय संघातील आमने-सामने आकडेवारी आणि हैदराबादमधील हवामानावर नजर टाकूयात.

भारत- न्यूझीलंड आमने-सामने आकडेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand Head to Head ODI) संघ वनडे क्रिकेटमध्ये एकूण 113 वेळा आमने- सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. भारताने 55 सामन्यात विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडने 50 वनडेत भारताला पराभवाचा धक्का दिला होता. 7 सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. भारतीय संघाने मायदेशात 26, तर न्यूझीलंडने त्यांच्या मायदेशात 26 वनडे जिंकले आहेत. यादरम्यान भारताने देशाबाहेर 14 सामने नावावर केले आहेत. तसेच, तटस्थ ठिकाणांवर भारताने 15 वनडे सामन्यात विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडच्या पारड्यात 16 विजय पडले आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हैदराबाद हवामान अंदाज
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी (दि. 18 जानेवारी) खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडेत हैदराबादचे तापमान 22 ते 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश पूर्णत: स्वच्छ असेल. सामन्याच्या दिवसी पावसाची शक्यता नाहीये. अशात सामन्यात हवामानाचा कोणताही अडथळा नसण्याची चिन्हे आहेत. त्यावेळी आर्द्रता 40 टक्के आणि वाऱ्याचा वेग ताशी 5 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.

खेळपट्टीविषयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमच्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. दुसऱ्या डावात खेळपट्टीतून फिरकीपटूंना मदत मिळण्याची आशा आहे. नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करेल. हैदराबादमध्ये दोन्ही संघांनी 6 वेळा एकमेकांचा सामना केला आहे. इथे पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 सामन्यात विजय मिळवला आहे, तर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघालाही 3 वेळा विजय मिळवण्यात यश आले आहे. या खेळपट्टीवरील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या ही 277 इतकी आहे.

आता भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वनडे सामन्यात कोण पहिल्या फलंदाजी घेऊन किती धावा करतंय याकडे सर्वांचे लक्ष असेल. (india vs new zealand odi head to head stats records pitch report weather forecast know full details know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबो! विराटच्या बॅटची ‘एवढी’ किंमत, ‘MRF’कडूनच वर्षाला मिळतात कोट्यवधी रुपये
सूर्यकुमार यादव टी-20त सुपरहिट, पण वनडेत फ्लॉप! तिरुअनंतपुरममध्ये पुन्हा ठरला अपयशी

Related Articles