---Advertisement---

श्रीलंकेला 317 धावांनी चिरडत टीम इंडियाने बनवला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, इतिहासात कोणालाही नव्हते जमले

Team India
---Advertisement---

श्रीलंकन संघ भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 317 धावांनी पराभूत झाला. उभय संघांतील हा वनडे मालिकतील शेवटचा सामना होता. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहली आणि शुबमन गिल भारतासाठी मॅच विनर्स ठरले. पण संघाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर काही खास विक्रमांची नोंद झाली.

भारताविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंका संघ मोठ्या अंतराने पराभूत झाला असून भारताच्या नवावार एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारत असा पहिलाच संघ बनला आहे, ज्याने 300 धावांपेक्षा मोठ्या अंतराने सामना जिंकला असेल. हा विक्रम यापूर्वी न्यूझीलंड संघाच्या नावावर होता. न्यूझीलंडने 2008 साली वनडे सामन्यात आयर्लंडला 290 धावांनी पराभूत केले होते. मात्र रविवारी (15 जानेवारी) भारताने वनडे सामन्यात श्रीलंकन संघाला 317 धावांनी पराभूत करत या यादीत पहिला क्रमांक पटकावला. यादीत तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा आहे. ऑस्ट्रेलियाने 2015 साली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात 275 धावांनी विजय मिळवला.

वनडे सामन्यात सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवणारे संघ
317 – भारत विरुद्ध श्रीलंका (तिरुअनंतपुरम, 2023)
290 – न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड (ऍबरडीन, 2008)
275 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (पर्थ, 2015)

उभय संघांतील या सामन्याचा विचार केला तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितने स्वतः 42 धावांची खेळी करून विकेट गमावली. त्याच्या साथीने डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शुबमन गिलने 116 धावांची खेळी केली. रोहित आणि शुबमनने पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने मागच्या चार वनडे सामन्यातील त्याचे तिसरे शतक ठोकले. विराटने 110 चेंडू खेळून 166 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 74 वे शतक ठरले. विराट आणि गिलच्या शतकांच्या जोरावर भारताने प्रतम फलंदाजी करताना 5 बाद 390 धावा केल्या.

प्रत्युत्तरात श्रीलंका संघ मात्र एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिला. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला. सिराजने 10 षटकांमध्ये 32 धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. भारताने या मालिकेतील जिंकलेला हा सलग तिसरा सामना असल्यामुळे पाहुण्या श्रीलंका संघाला क्लीन स्वीप मिळाला. तत्पूर्वी उभय संघांतील टी-20 मालिका भारताने 2-1 अशा आघाडीने घेतली. (The Indian team get the biggest win in the history of ODI cricket )

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जागतिक क्रिकेटमध्ये विराटचा दबदबा! विरोधी संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम केला नावावर
टीम इंडियाने केली संक्रांत गोड! श्रीलंकेला अवघ्या 73 धावांवर गुंडाळत मिळवला 317 धावांनी विश्वविक्रमी विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---